नवी दिल्ली : लोकसभा आणि ताज्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्ष आणखी बळकट करण्यासाठी संघटनात्मक निवडणुकांचा वापर व्हावा, असे मत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केल़े मंगळवारी येथे महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवानंतर प्रथमच राहुल यांनी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांशी औपचारिक चर्चा केली़
संघटनात्मक निवडणुका स्वतंत्र, निष्पक्ष आणि पारदर्शी व्हाव्यात,अशी अपेक्षा त्यांनी यावेळी बोलून दाखविली़ मुल्लापल्ली रामचंद्रन यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाने एक केंद्रीय निवडणूक समिती स्थापन केली असून या समितीला सर्वाधिकार देण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितल़े काँग्रेसला निवडणुकीच्या मैदानात सलग पराभवाचे तोंड पाहावे लागत असताना, राहुल गांधी यांच्या या टिपणीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आह़े संघटनात्मक पातळीवरील त्रुटी हे काँग्रेसच्या पराभवाचे एक कारण मानले जात आह़े या पाश्र्वभूमीवर येत्या काळात पक्षात संघटनात्मक पातळीवर व्यापक बदलांची शक्यता व्यक्त केली जात आह़े
(लोकमत न्यूज नेटवर्क)
च्राहुल गांधी यांनी प्रारंभापासून पदाधिका:यांच्या निवडणुकीत तळागाळातील कार्यकत्र्याना महत्त्व देण्यावर भर दिला आह़े पक्षात प्रत्येक स्तरावर नवे नेतृत्व आणण्याची चर्चा पक्षात आधीच सुरू आह़े तीन वर्षाऐवजी दर पाच वर्षात संघटनात्मक निवडणूक घेण्यासाठी काँग्रेसने आपल्या घटनेत बदल केला आह़े या घटनाबदलानंतर पक्षाची पहिली संघटनात्मक निवडणूक पार पडणार आह़े तूर्तास काँग्रेस सदस्यत्व मोहीम सुरू असून ती 31 डिसेंबरला संपणार आह़े यानंतर नव्या पक्षात संघटनात्मक निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल़