शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातून जनतेचे प्रश्न हद्दपार, विरोधी पक्षाच्या खासदारांचा सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 12:49 IST

Politics News: लोकशाहीच्या सर्वोच्च सभागृहात सामान्य जनतेच्या प्रश्नांवर चर्चा न होता केवळ विधेयक संमत करण्यासाठी उपयोग होत आहे. या महत्त्वपूर्ण अधिवेशनातून जनतेच्या हाती काहीही मिळाले नाही, अशा शब्दांत विरोधी पक्षाच्या खासदारांनी भावना व्यक्त केल्या.

नवी दिल्ली : लोकशाहीच्या सर्वोच्च सभागृहात सामान्य जनतेच्या प्रश्नांवर चर्चा न होता केवळ विधेयक संमत करण्यासाठी उपयोग होत आहे. या महत्त्वपूर्ण अधिवेशनातून जनतेच्या हाती काहीही मिळाले नाही, अशा शब्दांत विरोधी पक्षाच्या खासदारांनी भावना व्यक्त केल्या.संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी सत्तारूढ पक्षातर्फे सभागृह चालविण्याच्या प्रक्रियेवरसुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

सरकार जनविरोधी -प्रियंका चतुर्वेदीशिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, “जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी सभापतींकडे अनेकदा विविध आयुधांच्या माध्यमातून प्रयत्न केला. या सूचनांवर सभापती महोदयांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. सरकारची भूमिका जनविरोधी आहे.” विधेयक संमत करण्याशिवाय कोणतेही काम या अधिवेशनात झालेले नसल्याचा आरोप खासदार चतुर्वेदी यांनी केला.

बोगस अधिवेशन -बाळू धानोरकरया अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. परंतु, या अधिवेशनातून सामान्य जनतेला काहीही मिळाले नाही. एक बोगस असे या अधिवेशनाला म्हणता येईल. सत्तारूढ पक्षाकडून बहुमताच्या जोरावर कामकाज रेटून नेले जात आहे. सामान्यांचे प्रश्न मात्र चर्चेला येत नाहीत. महागाईविरोधात विरोधकांनी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला, असे काँग्रेसचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी सांगितले.

सरकार बेमुरवत - सुनील तटकरेकेंद्र सरकार हे बेमुर्वत असून, जनतेच्या प्रश्नांना या सरकारच्या लेखी काहीही महत्त्व नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी केला. विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सातत्याने सामान्य जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी पाठपुरावा केला. परंतु, सरकारच्या आडमुठ्या भूमिकेमुळे शक्य होऊ शकले नाही, असेही तटकरे यांनी सांगितले.

अधिवेशन यशस्वी - गिरीश बापटअर्थसंकल्पीय अधिवेशन अत्यंत यशस्वी झाल्याचा दावा भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी केला. जनतेच्या विकासासाठी असलेली अनेक विधेयके संसदेने संमत केली. प्रश्नोत्तरे, विविध विषयांवर झालेल्या चर्चेत जनतेच्याच प्रश्नांवर चर्चा झाल्याचे खासदार बापट यांनी सांगितले.

टॅग्स :ParliamentसंसदCentral Governmentकेंद्र सरकार