शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

यूपीएमध्ये मतभेद, नितीश यांचा एनडीएचे उमेदवार कोविंद यांना पाठिंबा

By admin | Updated: June 21, 2017 22:21 IST

. बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा दिला

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 21 - राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीवरून यूपीएमधले मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा दिला आहे. पाटण्यात संयुक्त जनता दलाच्या नेत्यांची एक बैठक झाली. त्या बैठकीनंतर नितीश कुमार यांनी कोविंद यांना पाठिंबा जाहीर केला आहे. नितीश कुमार हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यानं यूपीएच्या एकीला सुरूंग लागला आहे. तर गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांनी एकत्र येऊ भाजपाचा उमेदवार पाडायचा, अशी भूमिका मांडली होती. नितीश कुमार यांनी पाठिंबा दिल्यानं रामनाथ कोविंद यांचा राष्ट्रपतिपदावरचा दावा आणखी भक्कम झाला आहे. नितीश यांच्या पाठिंब्यामुळे कोविंद यांना 70 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस नेतृत्वाखालील यूपीएसुद्धा लवकरात लवकर राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवाराचे देण्याची शक्यता आहे. तामिळनाडूमधील सत्ताधारी अण्णा द्रमुख आणि द्रमुक पक्षानंसुद्धा कोविंद यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. कोविंद यांना अनेक पक्षांचा पाठिंबा मिळत असल्यानं काँग्रेससमोरच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत नितीश कुमार सोबत राहावेत यासाठी काँग्रेसकडून प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात आली. मात्र नितीश कुमार यांनी कोविंद यांच्या पारड्यात वजन टाकल्यानं काँग्रेसच्या पायाखालची जमीन सरकली आहे. नितीश कुमार यांनी विरोधी पक्षांसोबतच राहू, असा विश्वास काँग्रेससह यूपीएला दिला होता. याबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्यासोबत नितीश कुमार यांची चर्चासुद्धा झाली होती. नितीश कुमार यांनी कोविंद यांना पाठिंबा जाहीर करताना कारणंही स्पष्ट केली आहेत. रामनाथ कोविंद बिहारच्या राज्यपालपदी त्यांनी कधीही सरकारसमोर अडचणी निर्माण केल्या नाहीत. त्यामुळेच नितीश कुमारांनी कोविंद यांना पाठिंबा जाहीर केल्याची चर्चा आहे.