शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिमांचे प्रश्न टाळणे विरोधी पक्षांना महागात पडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 05:23 IST

लोकसभा निवडणुकीत काँग्रेससह इतर विरोधी पक्षांना पुन्हा एकदा सपाटून मार खावा लागला.

- अ‍ॅड. फिरदोस मिर्झा (सामाजिक कार्यकर्ते)लोकसभा निवडणुकीत काँग्रेससह इतर विरोधी पक्षांना पुन्हा एकदा सपाटून मार खावा लागला. या अपयशासाठी त्यांनी मुस्लीम समाजाच्या प्रश्नांकडे केलेले अक्षम्य दुर्लक्ष मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरले. मुस्लीम समाजाकरिता ही निवडणूक फार विचित्र होती. त्यांना या निवडणुकीत मुद्दाम रस नव्हता. त्यामागे विविध कारणे होती. सत्ताधाऱ्यांच्या समर्थकांनी गेली पाच वर्षे सतत मुस्लिमांच्या विरोधात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मुस्लिमांवर सामूहिक हल्ले केले.गोरक्षणाच्या नावावर त्यांच्यावर अत्याचार केले. तिहेरी तलाकच्या माध्यमातून मुस्लिमांच्या वैयक्तिक जीवनात हस्तक्षेप करण्यात आला. अशा गंभीर घटना घडत असताना विरोधातील एकाही पक्षाने आवाज उठवला नाही.दुसºया बाजूने सत्ताधाऱ्यांनी आरोपींना वाचविण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले. तसेच, या निवडणुकीत एकाही पक्षाच्या जाहीरनाम्यात मुस्लीम समाजाच्या विकासाचा मुद्दा नव्हता. सर्वत्र केवळ मुस्लीमविरोधी वातावरण होते. या निवडणुकीत मुस्लिमांना भाजपने फक्त ७ तर, काँग्रेसने २४ तिकिटे दिली. परंतु, त्यांना निवडून आणण्यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत.याउलट प्रज्ञासिंह ठाकूरसारख्या व्यक्तींना उमेदवारी देण्यात आली. गेल्या वेळी वायनाडमधून काँग्रेसचे एम. आय. शाहनवाज विजयी झालेहोते.या वेळी त्या जागेवर राहुल गांधी उभे राहिले. तसेच, बिहारमध्ये जिंकण्याची ताकद असणारे शकील अहमद यांचे तिकीट काँग्रेसने कापले. एवढेच नाही तर, विरोधी पक्षांच्या स्टार प्रचारकांमध्ये मुस्लिमांचा समावेश नव्हता. त्यांना प्रचारात उतरविण्याचे प्रयत्नदेखील झालेनाहीत.परिणामी, या निवडणुकीत मुस्लीम समाज तटस्थ राहिला व त्याचा फायदा भाजप व सहकारी पक्षांना मिळाला. देशात मुस्लिमांची संख्या १५ टक्के आहे आणि निकालाचे अवलोकन केल्यास विरोधी पक्षांनी चार ते पाच टक्के मतफरकाने जागा गमावल्याचे दिसते.या निकालाचा मुस्लीम समाजावर विविध बाबतीत प्रभाव पडेल. ते आता सरकारवर अवलंबून न राहता स्वत:च्या बळावर उभे होण्याचा प्रयत्न करतील. भविष्यातील पिढीला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणतील. तसेच, विशिष्ट गटाने जाणीवपूर्वक खराब केलेली प्रतिमा सुधारतील.या निवडणुकीत मुस्लीम समाज तटस्थ राहिला व त्याचा फायदा भाजप व सहकारी पक्षांना मिळाला. देशात मुस्लिमांची संख्या १५ टक्के आहे आणि विरोधी पक्षांनी चार ते पाच टक्के मतफरकाने जागा गमावल्या.