- हरीश गुप्ता, नवी दिल्लीराष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीत भाजपने आपला स्वत:चा उमेदवार निवडून आणण्यासाठी आपल्या ३३ मित्रपक्षांना राजी करायला सुरवात करताच विरोधकही भाजपच्या उमेदवाराविरोधात एकच उमेदवार उभा करण्याच्या प्रयत्नांत आहेत. येत्या जुलै महिन्यात ही निवडणूक होत आहे.जनता दलाचे (संयुक्त) नेते शरद यादव हे विरोधकांचे एकमताचे उमेदवार म्हणून समोर येत आहेत. परंतु त्यांच्याच नावावर अंतिम निर्णय झालेला नाही. उच्च पातळीवरील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या विषयावर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्यामध्ये प्राथमिक स्वरुपाची चर्चा झालीही आहे. विरोधकांनी या निवडणुकीत एकत्रितपणे उमेदवार द्यावा, असे गांधी व येचुरी यांना वाटते. भाजपला आजही बहुमत नाही. तृणमूल काँग्रेस, बिजू जनता दल, तेलंगण राष्ट्र समिती, वायएसआर (काँग्रेस), जनता दल (एस), झारखंड मुक्ती मोर्चा, द्रमुक, अ. भा. अद्रमुक असे छोटे आणि राज्य पातळीवरील पक्ष एकत्र आले तर विरोधकांचा उमेदवार विजयी होऊ शकतो यावर चर्चेत भर दिला गेला. याविषयावर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे पहिल्यांदा येचुरी यांच्याशी बोलले. कुमार यांनी नंतर समाजवादी पक्षाचे मुलायम सिंह यादव व राहुल गांधी यांच्याशी अनौपचारिक चर्चा केली. भाजपविरोधात एकच उमेदवार उभा करण्याच्या कल्पनेला राष्ट्रीय जनता दलाचे लालू प्रसाद यादव यांचाही पाठिंबा आहे.शरद यादव यांचे नाव मात्र अजून अंतिम झालेले नाही. परंतु सध्याची देशातील राजकीय परिस्थिती विचारात घेता उमेदवार हा मागासवर्गीय किंवा अनुसूचित जाती किंवा जमातीचा असावा, असे मानले गेले.
राष्ट्रपतीपदासाठी विरोधकांचाही एकी
By admin | Updated: April 12, 2017 00:41 IST