शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

विरोधक धर्मसंकटात; श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाण्याबाबत द्विधा स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2023 05:22 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असलेल्या या सोहळ्याला जावे की नाही, याबाबत विरोधक विचार करीत आहेत.

संजय शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली ( Marathi News ):  अयोध्येतील श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमंत्रणपत्रिकेने विरोधी पक्षांना धर्मसंकटात टाकले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असलेल्या या सोहळ्याला जावे की नाही, याबाबत ते विचार करीत आहेत.

२२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असलेल्या सोहळ्यात देशातील ५ हजार मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मागील ३५ वर्षांत श्रीराम मंदिराचा मुद्दा देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिला होता. या मुद्यावर भाजपने देशभर निवडणुका लढवल्या होत्या व यश प्राप्त केले होते. 

अयोध्येतील श्रीराम मंदिर तीर्थक्षेत्र न्यास व विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण देत आहेत. याबाबत काँग्रेससह सर्व राजकीय पक्ष सोहळ्याला जावे की न जावे, याबाबत द्विधा मन:स्थितीत आहेत. थेट नकार दिल्यास भाजपला निवडणुकीत त्यांना रामद्रोही म्हणण्याची संधी मिळेल. निमंत्रण देऊनही हे लोक आले नाहीत. अयोध्येत मंदिर व्हावे, असे यांना वाटत नव्हते, असे भाजप २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत म्हणेल. विरोधक अयोध्येत सोहळ्यासाठी गेले, तर मुस्लीम समाज नाराज होईल, अशा द्विधा मन:स्थितीत ते आहेत. सर्वांत गोंधळलेली स्थिती अखिलेश यादव यांची आहे. ते जाण्यासाठी नकार देत नाहीत.  अशीच स्थिती काँग्रेसची आहे. काँग्रेसही स्पष्टपणे हो किंवा नाही म्हणू शकलेली नाही. 

धर्म व्यापक विषय

सीपीएम नेते सीताराम येचुरी यांना नृपेंद्र मिश्र यांनी निमंत्रण दिले. येचुरी यांनी त्यांना सांगितले की, धर्म हा व्यापक विषय आहे; परंतु अयोध्येत २२ जानेवारी रोजी यावर राजकारण होईल. त्यापासून आम्ही दूर राहू इच्छित आहोत. त्यामुळे आम्ही येणार नाही. आता सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिका राष्ट्रीय पक्षांपासून प्रादेशिक पक्षांना दिल्या जातील. त्यावर काँग्रेसलाही भूमिका स्पष्ट करावी लागेल.

राम मंदिरात ९ देशांची वेळ सांगणारे घड्याळ

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेबाबत देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. अनेकांनी राम मंदिरासाठी काही ना काही दान दिले आहे. यातच आता लखनौ येथील भाजी विक्रेते अनिल कुमार साहू यांनी राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांच्याकडे पेटंट असलेले घड्याळ सुपूर्द केले आहे. या घड्याळाचे वैशिष्ट्य म्हणजे हे घड्याळ एकाच वेळी ९ देशांची वेळ सांगते. हे घड्याळ भारत, मेक्सिको, जपान, दुबई, टोकियो, मेक्सिको सिटी, वॉशिंग्टन यासारख्या नऊ देशांतील शहरांची वेळ सांगते.

 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या