शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राज्यसभेत विरोधक आक्रमक; कामकाज स्थगित, नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 01:21 IST

गुजरात निवडणुकीच्या काळात माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्याविरुद्ध वक्तव्ये करणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी, अशी मागणी करीत शुक्रवारी विरोधी पक्षांनी आक्रमक रूप धारण केले. त्यामुळे सभागृहाचे कामकाज प्रथम तीन वेळा आणि नंतर दुपारी ३ वाजता दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

नवी दिल्ली : गुजरात निवडणुकीच्या काळात माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्याविरुद्ध वक्तव्ये करणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी, अशी मागणी करीत शुक्रवारी विरोधी पक्षांनी आक्रमक रूप धारण केले. त्यामुळे सभागृहाचे कामकाज प्रथम तीन वेळा आणि नंतर दुपारी ३ वाजता दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्याचे पडसाद हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शुक्रवारी उमटले. विरोधी पक्षांनी याचा जाब सरकारला विचारला. या गदारोळात काँग्रेस आणि सपाचे सदस्य पुन्ह:पुन्हा समोरच्या भागात येत घोषणाबाजी करीत होते. यावेळी विरोधी पक्षाचे नेते गुलाम नबी आझाद यांनी पंतप्रधान आणि माजी पंतप्रधान यांचे नाव न घेता स्पष्ट केले की, हे आरोप न केवळ सरकारसाठी, तर विरोधी पक्षांसाठीही गंभीर आहेत. गुलाम नबी आझाद यांनी निवडणुकीच्या काळात माजी पंतप्रधान, माजी सैन्य प्रमुख आणि माजी अधिकारी यांच्याबाबत गंभीर आरोप केल्याचा मुद्दा उपस्थित केला. विरोधी पक्षांची नोटीस स्वीकारली नसल्याचे सभापतींनी स्पष्ट करताच काँग्रेसचे सदस्य आक्रमक झाले आणि गदारोळातच कामकाज अडीच वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

टॅग्स :Parliamentसंसद