शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

Sofia Qureshi : Video - "माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 15:17 IST

Operation Sindoor And Sofia Qureshi : सोफिया कुरेशी यांनी 'ऑपरेशन सिंदूर' वर मीडिया ब्रीफिंग केल्यानंतर, त्यांचे सासरे गौसब बागेवाडी यांचं विधान प्रत्येक भारतीयाच्या मनाला स्पर्शून गेलं आहे.

कर्नल सोफिया कुरेशी यांनी 'ऑपरेशन सिंदूर' वर मीडिया ब्रीफिंग केल्यानंतर, त्यांचे सासरे गौसब बागेवाडी यांचं विधान प्रत्येक भारतीयाच्या मनाला स्पर्शून गेलं आहे. कर्नाटकातील बेलागावी जिल्ह्यातील कोन्नूर गावातील रहिवासी असलेले गौसब साहेब म्हणाले की, "माझ्या सुनेचा मला अभिमान वाटत आहे. ती सहा महिन्यांपूर्वी गावाला आली होती. आज गावातील लोक माझं अभिनंदन करण्यासाठी मला भेटायला येत आहेत. मला खूप आनंद झाला आहे." 

गौसब साहेब यांनी आपल्या मुलाशी संवाद साधला, जे स्वतः भारतीय सैन्यात अधिकारी आहे. मुलाने त्यांना धीर दिला आणि सांगितलं की त्यांची काळजी करण्याची गरज नाही. कर्नल सोफिया कुरेशी या भारतीय लष्कराच्या सिग्नल कोरच्या अधिकारी आहेत. त्या अशा कुटुंबातील आहे ज्यांनी पिढ्यानपिढ्या सैन्यात सेवा केली आहे आणि  लहान वयातच देशाची सेवा करण्याचं स्वप्न पाहिलं होतं. 

भारताची नारी शक्ती! सोशल मीडियावर सोफिया कुरेशी, व्योमिका सिंह यांचा दबादबा, होतंय कौतुक

सोफिया कुरेशी यांचे पती कर्नल ताजुद्दीन बागेवाडी हे देखील भारतीय सैन्यात अधिकारी आहेत आणि ते कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील कोन्नूर गावचे रहिवासी आहेत. सासरे गौसब बागेवाडी यांनी अभिमानाने सांगितलं की, गावात उत्साहाचं, जल्लोषाचं वातावरण आहे आणि संपूर्ण कुटुंबाला त्यांचा अभिमान आहे. ७ आणि ८ मे २०२५ च्या रात्री, जेव्हा भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेमध्ये असलेल्या ९ दहशतवादी तळांवर  कारवाई केली.

बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटूंबियांना अभिमान

काही तासांनंतर देशवासीयांना पहिल्यांदाच याची माहिती देण्यात आली. ही माहिती कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह या दोन महिला लष्करी अधिकाऱ्यांनी दिली. सोफिया कुरेशी यांची बहीण शायना सुनसारा या भावुक झाल्या. सोफिया यांचा त्यांना अभिमान वाटत आहे. शायना यांनी सांगितलं की, “आम्ही काल बोललो आणि एक आर्मी ऑफिसर असल्यामुळे तिने घडलेल्या घटनेबद्दल एकही शब्द सांगितला नाही. हे आमच्या सर्वांसाठी आश्चर्यकारक होतं, पण सोफियाला या पदावर पाहणं अभिमानाची गोष्ट होती."

“देशासाठी काहीतरी करण्याची तिचं नेहमीच ध्येय होतं. तिला डीआरडीओमध्ये सामील व्हायचं होतं, शास्त्रज्ञ व्हायचं होतं आणि डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्यासोबत काम करायचं होतं. तिला अमेरिकेतूनही अनेक ऑफर आल्या होत्या, पण तिला भारतात राहून सैन्यात भरती व्हायचं होतं. ती पहिल्याच प्रयत्नात सैन्यात सामील झाली. सुरुवातीला माझं स्वप्न सैन्यात भरती होण्याचं होतं, पण एनसीसीमध्ये असूनही आणि सर्व प्रयत्न करूनही माझी निवड झाली नाही. मला अजूनही वाईट वाटतं, पण जेव्हा मी सोफियाला वर्दीत पाहते तेव्हा असं वाटतं की मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगत आहे” असं शायना यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरsurgical strikeसर्जिकल स्ट्राइकPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndian Armyभारतीय जवान