शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
2
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
3
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
4
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
6
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
7
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
8
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
9
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
10
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
11
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
12
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
13
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
14
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
15
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
16
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह
17
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
18
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
19
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
20
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर

ऑपरेशन सिंदूरचे बक्षीस; DGMO जनरल राजीव घई यांना पदोन्नती, आता या पदावर काम करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 14:45 IST

Lieutenant General Rajeev Ghai: पाकिस्तानी सैन्याने युद्धविरामासाठी ज्या अधिकाऱ्यासमोर जोडले होते हात, त्यांना मिळाली पदोन्नती.

Lieutenant General Rajeev Ghai: पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, भारताने 'ऑपरेशन सिंदूर'द्वारे पाकला चोख प्रत्युत्तर दिले. भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या बहावलपूर, मुरीदके येथील अनेक दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. तसेच, पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनाही जोरदार प्रत्युत्तर दिले. दरम्यान, या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावणारे लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना पदोन्नती मिळाली आहे. 

उप-लष्कर प्रमुखपदी नियुक्तीराजीव घई सध्या लष्करी ऑपरेशन्सचे महासंचालक, म्हणजेच डीजीएमओ म्हणून कार्यरत आहेत. आता त्यांना उप लष्करप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. ते दोन्ही पदांवर कायम राहतील. ऑपरेशन सिंदूर दरम्यान नष्ट झालेल्या पाकिस्तानच्या दहशतवादी तळांची सविस्तर माहिती देण्यासाठी राजीव घई मीडियासमोर आले होते.

संरक्षण मंत्र्यालयाची माहितीसंरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात घई यांच्या नवीन जबाबदाऱ्यांबद्दल माहिती दिली आहे. संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, लष्कर-गुप्तचर संस्था आणि लष्करी कारवायांशी संबंधित इतर विभागांमधील चांगले समन्वय आणि सहकार्य यासाठी डीजीएमओ राजीव घई यांना उप-सेनाप्रमुख बनवण्यात आले आहे.

पाकिस्तानी सैन्याने जोडले होते हातदरम्यान, डीजीएमओ पदावर असताना राजीव घई सैन्य आणि देशाच्या गुप्तचर संस्थांमधील समन्वयाचे काम हाताळतात आणि महत्त्वाच्या लष्करी बाबींवर लष्करप्रमुखांना सल्ला देखील देतात. त्यांना सैन्यातील उत्कृष्ट सेवांसाठी उत्तम युद्ध सेवा पदकदेखील मिळाले आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान राजीव घई यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. भारताच्या जलद हल्ल्यांमुळे घाबरलेल्या पाकिस्तानच्या डीजीएमओने राजीव घई यांनाच फोनद्वारे युद्धविरामाची विनवणी केली होती.

लेफ्टनंट जनरल राजीव घई यांचा अल्पपरिचयडीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई हे कुमाऊँ रेजिमेंटचे लष्करी अधिकारी आहेत. घई यांनी भारतीय सैन्यात अनेक मोठ्या ऑपरेशन्सचे नेतृत्व केले आहे. डीजीएमओ म्हणून नियुक्त होण्यापूर्वी घई चिनार कॉर्प्सचे जीओसी होते. त्यांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादाविरुद्ध अनेक लष्करी ऑपरेशन्सचे नेतृत्व केले आहे.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndian Armyभारतीय जवान