शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

CAA: अशिक्षित,पंक्चर काढणाऱ्या लोकांचाच विरोध; भाजप खासदाराकडून आंदोलकांची खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2019 14:37 IST

आम्ही एक नवीन भारत बनवत असल्याचे खासदार सूर्या म्हणाले.

बंगलोर: नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशभरात आंदोलन सुरु आहे. तर याच कायद्याच्या समर्थनार्थ भाजपकडून रैली काढण्यात येत आहे. सोमवारी बंगळुरु दक्षिणमध्ये भाजपकडून काढण्यात आलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ बोलताना भाजपच्या खासदाराने या कायद्याला विरोध करणाऱ्या आंदोलकांची खिल्ली उडवली. देशातील अशिक्षित व पंक्चर काढणारी लोकचं फक्त या कायद्याला विरोध करत असल्याचे विधान बंगलोरमधील खासदार तेजस्वी सूर्या यांनी केले आहे.

यावेळी बोलताना खासदार तेजस्वी सूर्या म्हणाले की, बंगलोरमधील IT आणि BT सेक्टरमध्ये काम करणारे लोकं देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी हातभार लावत आहे. यात वकील,बँक कर्मचारी आणि सामन्य व्यक्ती सुद्धा आहे. त्यामुळे हे सर्व लोकं नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ एकत्र आले आहे. मात्र अशिक्षित आणि पंक्चर काढणारी लोकंच या कायद्याला विरोध करत असल्याचे खासदार तेजस्वी सूर्या म्हणाले.

तर पुढे बोलताना ते हे सुद्धा म्हणाले की, कमकुवत आणि प्रभावहीन धर्मनिरपेक्षतेला या देशात कोणतेही स्थान नाही. आम्ही एक नवीन भारत बनवत असल्याचे खासदार सूर्या म्हणाले. याचवेळी त्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्यांवर सुद्धा टीका केली. त्यांच्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्याप्रमाणावर व्हायरल झाला आहे.

त्यांच्या या वक्तव्यानंतर आता काँग्रेसकडून सुद्धा उत्तर देण्यात आला आहे. काँग्रेसचे नेते श्रीवास्तव वाई.बी यांनी म्हंटल आहे की, खासदार तेजस्वी सूर्या हे एका श्रीमंत कुटुंबातून आहेत. CAA विरोधात आंदोलन करणार्‍यांना त्यांनी कोणत्या अधिकारातून अशिक्षित आणि पंक्चर काढणारे म्हटले ? मला हे जाणून घ्यायचे आहे. तसेच यापुढे गरीब लोकांना आंदोलन करण्याचा अधिकार नाही का? असा प्रश्न सुद्धा त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.