शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या बंधनामुळे 42 आमदार मुकले राखीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 14:47 IST

गुजरात राज्यसभा निवडणुकीमुळे सोमवारी काँग्रेसच्या बहुसंख्य आमदारांना रक्षाबंधनाच्या सणाला मुकावे लागले.

ठळक मुद्देगुजरात राज्यसभा निवडणुकीमुळे सोमवारी काँग्रेसच्या बहुसंख्य आमदारांना रक्षाबंधनाच्या सणाला मुकावे लागले. काँग्रेस आमदारांना त्यांच्या बहिणींनी पाठवलेल्या राख्या रिसॉर्टवरच मिळाल्या.

सूरत, दि. 8 - रक्षा बंधन हा बहिण-भावाच्या नात्याचा बंध अधिक दृढ करणारा दिवस. पण गुजरात राज्यसभा निवडणुकीमुळे सोमवारी काँग्रेसच्या बहुसंख्य आमदारांना रक्षाबंधनाच्या सणाला मुकावे लागले. फक्त दोन आमदारांना हा सण साजरा करता आला. सानखेडा येथील काँग्रेसचे आमदार धीरु भील आणि काडीचे आमदार रमेश चावडा यांच्या बहिणींनी नीजानंद रिसॉर्टवर येऊन आपल्या भावांना राखी बांधली. 

इतर काँग्रेस आमदारांना त्यांच्या बहिणींनी पाठवलेल्या राख्या रिसॉर्टवरच मिळाल्या. गुजरात राज्यसभा निवडणुकीत मतांची फाटाफूट टाळण्यासाठी मागच्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या 44 आमदारांना बंगळुरुतल्या रिसॉर्टवर ठेवण्यात आले होते. हे सर्व आमदार सोमवारी गुजरातमध्ये परतले. त्यांना आनंद जिल्ह्यातील रिसॉर्टवर ठेवण्यात आले होते. धीरु भील यांची बहिण रेणुका(55) नासवाडी येथून आली होती.

आमदारांशी कुठल्याही बाहेरच्या व्यक्तीने संपर्क करु नये म्हणून काँग्रेसने प्रचंड खबरदारी घेतली होती. प्रवेशव्दारावर काँग्रेस कार्यकर्त्यांचा खडा पहारा होता. नातेवाईकांची ओळख पटेपर्यंत त्यांना प्रवेशव्दारावर थांबवून ठेवण्यात आले होते. रेणूका यांना जवळपास तासभर प्लास्टिकच्या खुर्चीवर बसवून ठेवण्यात आले होते. भावाला ओवाळण्यासाठी राखी आणि मिठाईचा डब्बा त्यांनी सोबत आणला होता. बरीच फोनाफोनी झाल्यानंतर त्यांची ओळख पटवण्यात आली. त्यानंतर त्यांना रिसॉर्टमध्ये प्रवेश देण्यात आला. 

मी आतापर्यंत एकदाही रक्षाबंधनाचा सण चुकवलेला नाही. यावर्षी माझा भाऊ दुस-या शहरात होता. त्यामुळे त्याला भेटता येणार नाही असे मला वाटत होते. पण रविवारी संध्याकाळी त्याने मला फोन केला आणि इथे येण्याची व्यवस्था करतो असे सांगितले. त्यामुळे मला यंदाचे रक्षाबंधन साजरे करता आले. चावडा यांच्या बहिणीसोबत त्यांची मुले सुद्धा गेली होती. चावडा यांच्या बहिणीने काहीही बोलण्यास नकार दिला. भेट खासगी होती त्यामुळे आपण काही बोलणार नाही असे त्यांच्या बहिणीने सांगितले.