ऑनलाइन लोकमतलखनऊ, दि. 19 - उत्तरप्रदेश राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून भाजपाचे योगी आदित्यनाथ शपथ घेतील, त्यांच्याबरोबर अन्य 40 आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तर दिनेश शर्मा आणि केशव प्रसाद मौर्य यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली जाणार आहे. एबीपी न्यूजच्या वृत्तानुसार, योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात मोहसिन रझा या एकमेव मुस्लीम चेहऱ्याचा समावेश असणार आहे.उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने एकाही मुस्लीम उमेदवाराला तिकीट दिलं नसल्यानं विरोधकांकडून टीका होत होती. त्यातच शनिवारी भाजपने हिंदू कार्ड पुढं करत योगी आदित्यनाथ यांच्या नावाची घोषणा केली. योगी आदित्यनाथ यांची प्रतिमा कट्टर हिंदुत्ववादाची असल्याने, त्यांच्या मंत्रिमंडळात मुस्लीम चेहरा असेल की नाही याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. पण आज शपथविधी घेणाऱ्या 40 जणांच्या यादीत मोहसिन रझा यांच्या नावाची घोषणा झाल्याने अनेकांना अश्चर्याचा धक्का बसला आहे.वास्तविक रजा यांच्या निवडीमागे उत्तर प्रदेशातील अल्पसंख्याक कल्याण विभाग, वक्फ बोर्ड सोबत इतर प्राधिकरणांवर मुस्लीम व्यक्तीची नियुक्ती करणं बंधनकारक आहे. त्यामुळेच मोहसिन रझा यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे.मोहसिन रझा यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपत प्रवेश केला असून, त्यांना उत्तर प्रदेश भाजप प्रवक्तेपदी नियुक्त करण्यात आलं होतं. रझा यांनी राजकीय क्षेत्राशिवाय क्रिडा क्षेत्रातही चमकदार कामगिरी बजावली आहे.
एकमेव मुस्लीम चेहऱ्याला मंत्रीपदाची शपथ घेण्याचा योग
By admin | Updated: March 19, 2017 14:09 IST