शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

केवळ झाडावर चढून तो कमवतो महिन्याला सव्वालाख रुपये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 05:51 IST

सर्वच नशिबाच्या हवाली सोडून चालत नाही. मेहनतच श्रेष्ठ... मेहनत वाया जात नाही. त्याचे फळ हमखास पदरात पडतंच. हेच खरं. सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत तब्बल बारा तास राबणारे केरळमधील ई. पी. सॅलिमॉन यांची दिवसाची कमाई ४ हजार रुपये, म्हणजेच दरमहा जवळपास सव्वा लाख रुपये आहे.

कोट्टायम : सर्वच नशिबाच्या हवाली सोडून चालत नाही. मेहनतच श्रेष्ठ... मेहनत वाया जात नाही. त्याचे फळ हमखास पदरात पडतंच. हेच खरं. सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत तब्बल बारा तास राबणारे केरळमधील ई. पी. सॅलिमॉन यांची दिवसाची कमाई ४ हजार रुपये, म्हणजेच दरमहा जवळपास सव्वा लाख रुपये आहे. उंचच-उंच ताडीच्या झाडावर सरसर चढण्याचे कौशल्य आणि सातत्यानं मेहनत, हेच सॅलिमॉन यांचं भांडवल आहे. ताडाची झाडं असलेल्या मालकाला दर लिटर ताडीमागे ३० रुपये मिळतात, तर झाडांवर चढून ती ताडी खाली आणणाऱ्या सालिमॉन यांना लिटरमागे १८ रुपये मिळतात. याशिवाय सॅलिमॉनला रोजच्या भत्त्यापोटी ३०२ रुपयेही मिळतात. ते केरळ ताडी कामगार निधी मंडळाचे सदस्य आहेत. या मंडळाकडून पीएफ, ग्रॅच्युएटीही दिली जाते. वार्षिक बोनसही दिला जातो.उन्हाळ्यात ताडीला खूप मागणी असल्याने त्यांची कमाईही खूप होते. गेल्या ३२ वर्षांपासून ते हे काम करत आहेत. हे काम तसं मोठ्या जिकरीचंच त्यामुळे तरुण पिढी या कामासाठी पुढेच येत नाही. त्यामुळे गरज असतानाहीसॅलिमॉनना सुटी घेता येत नाही. कौटुंबीक कार्यक्रमालाही त्याला जाता येत नाही. ताडी दररोजउतवून विक्रेत्यांकडे पोहोचवावी लागते. वर्षातील ३६५ दिवस त्याचा मेहनतीचा जप चालूच असतो.त्यांच्या या मेहनतीचा केरळ सरकारने गौरवही केला होता. मागच्या वर्षात त्यांनी ४० हजार लिटर ताडी उतरविली. त्यांच्या या मेहनतीचा लाभ मदाप्पाडगावालाही झाला होता. तेही याच गावचे.मालकीचे घर, मुलींचे शिक्षण...या मेहनतीच्या कमाईतून सॅलिमॉन यांनी स्वत:चं पक्कं घर उभारले. त्यांची थोरली मुलगी एम. कॉम करते, तर धाकटीही बी. कॉम. झाली. जीवन काय, चांगलं-वाईट काय? याचे धडे वडिलांकडूनच मिळाले. मुलींना शिकवून त्यांचे हात पिवळे करायचे आहेत, हीच त्यांची इच्छा आहे.

टॅग्स :keralकेरळ