शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

केवळ ४९00 कोटींचे काळे धन घोषित; २१ हजार लोकांनी जाहीर केली जुन्या नोटांतील ‘रोख’ जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 01:07 IST

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेखाली (पीएमजीकेवाय) २१ हजार लोकांनी ४,९०० कोटी रुपयांचा काळा पैसा घोषित केला आहे, असा दावा प्राप्तिकर विभागाच्या एका वरिष्ठ अधिका-याने केला.

नवी दिल्ली : प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेखाली (पीएमजीकेवाय) २१ हजार लोकांनी ४,९०० कोटी रुपयांचा काळा पैसा घोषित केला आहे, असा दावा प्राप्तिकर विभागाच्या एका वरिष्ठ अधिका-याने केला. नोटाबंदीनंतर सरकारने काळा पैसा घोषित करून त्यावर कर आणि दंड चुकता करून लोकांसाठी एक योजना घोषित केली होती. ही योजना ३१ मार्च रोजी बंद झाली होती. त्यानुसार करापोटी २,४५१ कोटी रुपयांची वसुलीही झाली, असे हा अधिकारी म्हणाला.घोषित काळ्या पैशांचा हा अंतिम आकडा आहे. काही प्रकरणात कायदेशीर कारवाईबाबत प्राप्तिकर विभाग पाठपुरावा करीत आहे, असे सांगण्यात येत आहे. अर्थात ४९00 कोटी रुपये ही खूपच कमी रक्कम आहे. याहून अधिक रक्कम या योजनेखाली जाहीर होईल, अशी केंद्र सरकारची अपेक्षा होती. म्हणजेच या योजनेला अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळाला नाही, असे दिसते.महसूल सचिव हसमुख अढिया यांनीही पंतप्रधान गरीब कल्याण योजनेखाली घोषित झालेल्या काळ्या पैशांच्या आकड्यावरून या योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही, असे सांगितले होते. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मात्र प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेपूर्वी अशाच प्रकारची एक योजना होती. त्यामुळे या योजनेला जनतेकडून मिळालेल्या प्रतिसादाकडे वेगळ्या अर्थाने पाहू नये, असे म्हटले आहे.याआधी आयडीएस योजना होती. पीएमजीकेवाय या क्रमातील शेवटची योजना होय. त्यातहत घोषित काळ्या पैशांवर त्यावर कर आणि दंड चुकता करून संभाव्य कारवाईपासून सुटका करण्याची संधी देण्यात आली होती.काय होती योजना?या योजनेत ४९.९% कर, अधिभार आणि दंड देणे भाग होते. तसेच घोषित उत्पन्नापैकी २५% रक्कम बिनव्याजी खात्यात चार वर्षे ठेवायची आहे.

टॅग्स :Note Banनोटाबंदी