शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

ओटे दिलेे तरच गोलाणीत स्थलांतर बळीराम पेठ हॉकर्सची नाराजी: आयुक्तांकडून चुकीची माहिती

By admin | Updated: April 15, 2016 00:42 IST

जळगाव : एक तर गोलाणीत ओटे द्या किंवा बळीराम पेठेतील गल्लीत आतमध्ये व्यवसाय करू द्यावा अशी मागणी भाजीपाला विक्रेते असोसिएशनने केली असून आम्ही स्थलांतराची कोणतीही तयारी अद्याप दर्शविली नसल्याचे एका निवेदनाव्दारे कळविले आहे.

जळगाव : एक तर गोलाणीत ओटे द्या किंवा बळीराम पेठेतील गल्लीत आतमध्ये व्यवसाय करू द्यावा अशी मागणी भाजीपाला विक्रेते असोसिएशनने केली असून आम्ही स्थलांतराची कोणतीही तयारी अद्याप दर्शविली नसल्याचे एका निवेदनाव्दारे कळविले आहे.
बळीराम पेठेतील अतिक्रमणे काढणे व हॉकर्सचे स्थलांतर करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी बुधवारी हॉकर्स संघटनेच्या पदाधिकार्‍यांची बैठक मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी घेतली होती. या बैठकीनंतर बळीराम पेठेतील हॉकर्सना गोलाणीत जागा आखून देण्यात येणार असून हॉकर्सने यास सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे आयुक्तांनी सांगितले होते. या संदर्भात आज हॉकर्स संघटनेने एक निवेदन प्रसिद्धीस देऊन आयुक्तांचा प्रस्ताव नाकारला आहे.
न्यायालयात दावा प्रलंबित
निवेदनात पुढे म्हटले आहे की, प्रत्यक्षात आम्ही कोर्टाच्या आदेशानेच व निकालानंतर देण्यात येणार्‍या जागेवर स्थलांतरित होणार आहोत. असे असताना महापालिकेकडून चुकीची माहिती देण्यात येत आहे.
गोलाणीत ओटे शिल्लक नाही
गोलाणी मार्केटमधील रिकाम्या ओट्यांची माहिती माहितीच्या अधिकारात मागितली असता तेथे ओटे वा गाळे शिल्लक नाहीत असे कळविण्यात आले. महापालिका ओट्यांच्या खाली फुटपाथच्या जागेवरती तात्पुरती आखणी करून ओटे तयार करीत असून त्या ठिकाणी आम्हाला स्थलांतरित करण्याच्या तयारीत आहे. आयुक्तांनी पर्यायी जागेची विचारणा केली असता आम्ही गोलाणीत ओटे द्या ते शक्य नसल्यास बळीराम पेठेतच आतील गल्लीमध्ये व्यवसाय करू द्यावा, साने गुरुजी रुणालयाच्या मोकळ्या जागेत व्यवसाय करू द्यावा, जुन्या नगरपालिकेच्या मोकळ्या जागेत व्यवसाय करू द्यावा अशी मागणी या हॉकर्सने केली आहे. गोलाणीत तुर्तास स्थलांतरित होण्याची कोणतीही तयारी आम्ही दर्शविली नसल्याचे भाजीपाला विक्रेता असो.च्या अध्यक्षा शकुंतला पाटील व अन्य पदाधिकार्‍यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.