शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दागिन्यांवर हॉलमार्किंगसाठी येणार ऑनलाइन रजिस्ट्रेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 03:27 IST

सोन्याचे दागिने किती शुद्ध आणि त्यात किती खोट आहे हे त्यावरील हॉलमार्कवरून समजेल

एस. के. गुप्ता नवी दिल्ली : नव्या वर्षात देशात सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग लागू केले जाईल. केंद्रीय ग्राहक मंत्रालयाने सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग अनिवार्य करण्यासाठी भारतीय मानक ब्युरोला (बीआयएस) जनजागृती मोहीम राबवणे व सराफांना (ज्वेलर्स) आॅनलाइन रजिस्ट्रेशन देण्यासाठी आदेश दिले गेले आहेत. बीआयएसकडून ज्वेलर्सला आॅनलाईन रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट देण्याच्या दिशेने सॉफ्टवेअरवर काम केले जात आहे.

केंद्रीय ग्राहक कामकाज, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी सांगितले की, यामुळे सोन्याचे दागिने किती शुद्ध आणि त्यात किती खोट आहे हे त्यावरील हॉलमार्कवरून समजेल. यामुळे दागिने उद्योगावर मोठा प्रभाव पडेल. परंतु, ग्राहकांना याचा जास्त लाभ होईल. पासवान म्हणाले की, दागिन्यांवरील हॉलमार्किंगचा प्रस्ताव वाणिज्य मंत्रालयाने आधीच डब्ल्यूटीओला पाठवला आहे. डब्ल्यूटीओ येत्या डिसेंबरमध्ये आपल्या संकेतस्थळावर तो अधिसूचित करील.

बीआयएसचा एक वरिष्ठ अधिकारी म्हणाला की, दागिन्यांवर हॉलमार्किंग एक जानेवारीपासून लागू केले जाईल. नव्या नियमांनुसार सोन्याच्या दागिन्यांचे तीन वर्ग असतील. २२, १८ व १४ कॅरेट. सोन्याची शुद्धतेच्या आधारे हॉलमार्किंग केली जाईल. सध्या हॉलमार्किंग होत नसल्यामुळे बाजारात नकली सोन्याचीही विक्री होते. दागिन्यांवर हॉलमार्किंग असल्यामुळे ग्राहकालाही समाधान मिळेल आणि खरेदी करणाऱ्याला दुकानदाराबद्दल विश्वास वाटेल की जो दागिना आपण खरेदी करीत आहोत त्याची शुद्धता किती आहे व त्यासाठी आपण किती पैसे मोजत आहोत.हॉलमार्किंगची तयारीबीआयएसने ८०० हॉलमार्किंग केंद्र बनवले आहेत. त्यांच्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असेल. त्यामुळे दागिन्यांवर हॉलमार्किंगबाबत काहीही गडबड होणार नाही. ज्वेलर्ससाठी हॉलमार्किंग नोंदणी शुल्क (रजिस्ट्रेशन फी) २५ हजार रूपये आहे. ती १० ते १५ हजार रूपये कपात करण्याची तयारी आहे. बीआयएस, नॅशनल टेस्टिंग हाऊस आणि लीगल मेट्रोलॉजीला त्यांच्यात उत्तम समन्वय ठेवण्यास सांगण्यात आले आहे म्हणजे कोणत्याही पायरीवर काम थांबू नये.

टॅग्स :Goldसोनं