शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कांदा निर्यातीवरील बंदी १५ मार्चपासून दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 05:33 IST

सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी कांदा निर्यातीवर असलेली बंदी १५ मार्चपासून मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

संतोष ठाकूरनवी दिल्ली : सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी कांदा निर्यातीवर असलेली बंदी १५ मार्चपासून मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले की, या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. देशात कांद्याची टंचाई निर्माण होऊन तो २०० रूपये किलोपर्यंत गेल्यावर सरकारने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये निर्यातीवर बंदी घातली होती. त्यामुळे देशात कांद्याची उपलब्धता वाढून भाव नियंत्रणात राहायला मदत झाली. याचबरोबर सरकारने तुर्की, अफगाणिस्तानसह अनेक देशांतून कांदा आयात केला. परंतु, तेथील कांदा आकाराने मोठा होता, त्याला भारतीय कांद्याची चव नव्हती, त्याचा जास्त वापर हा सलाडसाठी होत असल्यामुळे भारतात या कांद्याचा फार उपयोग झाला नाही.सरकारचे म्हणणे असे आहे की, कांद्याचे मार्च महिन्यात जोरदार पीक झाले आहे. हे पीक गेल्या वर्षीच्या ४० लाख टन पिकाच्या जवळपास ४० टक्के जास्त आहे. यामुळे मंड्यांमध्ये त्यांची आवक जास्त झाली आहे. किरकोळ बाजारात कांद्याच्या किमती बºयाच स्थिर झाल्या. या पार्श्वभूमीवर निर्यातीवर आणखी बंदी तर्कसंगत नाही. एका अधिकाºयाने सांगितले की, किरकोळ बाजारात कांदा ३०-४० रूपये किलोपर्यंत आला आहे. हा भाव मार्चमधील कांद्याच्या पिकानंतर आणखी कमी होईल. याशिवाय भारतीय बाजारात कांद्याचीउपलब्धता आमच्या मागणीपेक्षा बरीच जास्त असेल.