शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

हॉटस्पॉटमधील एक तृतियांश, झाले बाधित अन् उपचाराविना बरे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 03:04 IST

आयसीएमआर : पुण्या-मुंबईसह दहा शहरांच्या अभ्यासातील निष्कर्ष

नवी दिल्ली : देशाच्या विविध भागांतील कंटेन्मेंट झोन आणि हॉटस्पॉटमधील सुमारे एक तृतियांश नागरिकांना ‘कोविड-१९’ या रोगाची लागण झाली आणि उपचाराशिवाय ते आपोआप बरे झाले, असे इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने जाहीर केले आहे. यासंदर्भात आयसीएमआरने देशातील हायरिस्क झोनमधील नागरिकांच्या रक्तामधील सिरमच्या सर्वेक्षणावर आधारित अभ्यास केला. यात मुंबई, ठाणे, पुणे, अहमदाबाद, सुरत, दिल्ली, कोलकता, इंदूर, जयपूर आणि चेन्नई या १० शहरांतील कंटेन्मेंट झोन आणि हॉटस्पॉटमधील नागरिकांचा समावेश होता. या अभ्यासाचे प्राथमिक निष्कर्ष धक्कादायक असले तरी सुखावणारे आहेत.

या अभ्यासाच्या प्राथमिक निष्कर्षांनुसार, देशाच्या कंटेन्मेंट झोन आणि हॉटस्पॉटमधील १५ ते ३० टक्के नागरिकांना ‘कोविड-१९’ या रोगाची लागण झाली होती. अभ्यासाचा अहवाल अद्याप प्रसिद्ध केलेला नाही. तो केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव आणि पंतप्रधान कार्यालयाला सादर करण्यात आला आहे,असे आयसीएमआरच्या वतीने सांगण्यात आले.मुंबई, पुणे, दिल्ली, अहमदाबाद, इंदूरमध्ये संक्रमण दर जास्तच्मुंबई, पुणे, दिल्ली, अहमदाबाद आणि इंदूर या शहरांमध्ये संक्रमणाचा दर जास्त असल्याकडे या अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे. देशातील इतर हॉटस्पॉटपेक्षा या शहरांमध्ये संक्रमणाचा दर १०० पटीने जास्त असल्याचे हा अभ्यास सांगतो....असा केला अभ्यासच्मुंबई, ठाणे, पुणे, अहमदाबाद, सुरत, दिल्ली, कोलकाता, इंदूर, जयपूर आणि चेन्नई या प्रत्येक शहरातील १० कंटेन्मेंट झोन आणि हॉटस्पॉटमधील ५०० नागरिकांचे नमुने घेण्यात आले. यासोबतच २१ राज्यांतील ६० जिल्ह्यांतील प्रत्येकी ४०० नागरिकांचे नमुनेदेखील घेतले होते. भारतातील एकूण रुग्णांपैकी ७० टक्के रुग्ण हे आम्ही नमुने घेतलेल्या भागांतील होते, असे आयसीएमआरने आवर्जून नमूद केले.च्ईएलआयएसए (एन्झाईम लिंक इम्युनोसॉर्बंट अ‍ॅसे) आधारित अ‍ॅन्टीबॉडी चाचणी या सर्वेक्षणात घेण्यात आल्या. अभ्यासासाठी घेण्यात आलेल्या नमुन्यांपैकी किमान ८ जिल्ह्यांच्या नमुन्यांचा डेटाचे अद्याप विश्लेषण बाकी आहे. ते झाल्यानंतरच संपूर्ण अहवाल प्रकाशित करण्यात येईल, असे आयसीएमआरने सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMumbaiमुंबई