शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

पुलवामात एका दहशतवाद्याचा खात्मा; अनंतनागमध्ये चकमक सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2019 08:04 IST

दोन दिवसात चार दहशतवाद्यांना कंठस्नान

पुलवामा: सुरक्षा दलाच्या जवानांना एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात यश आलं आहे. जम्मू-काश्मीरच्या पुलवामात आज सकाळी सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. त्यात एक दहशतवादी मारला गेला. या दहशतवाद्याची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. पुलवामात मध्यरात्री सव्वा दोनपासून सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. केंद्रीय राखीव पोलीस दल, राष्ट्रीय रायफल्स आणि स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप यांनी संयुक्त कारवाई करत दहशतवाद्याला घेरलं. यानंतर सुरू झालेल्या चकमकीत दहशवाद्याला कंठस्नान घालण्यात यश आलं. एन्काऊंटर संपल्यानंतर जवानांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं. तेव्हा दहशतवाद्याचा मृतदेह हाती लागला. पुलवामासोबतच दक्षिण काश्मीरमधल्या अनंतनागमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. त्याआधी पुलवामात गुरुवारी (काल) दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू असताना लष्कराच्या एका अधिकाऱ्याला वीरमरण आलं. या कारवाईत तीन दहशतवादी ठार झाले. सुरक्षा दलांकडून सर्च ऑपरेशन सुरू असताना दहशतवाद्यांनी त्यांच्या दिशेनं गोळीबार केला. यानंतर सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर दिलं. या कारवाईत दोन जवान आणि एक नागरिक जखमी झाला. चकमकीत मारले गेलेले दहशतवादी जैश-ए-मोहम्मदचे असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे दहशतवादी एका घरात लपून बसले होते. दहशतवाद्यांनी घरातील एका नागरिकाला ओलीस ठेवलं होते. त्याचा मृतदेहदेखील जवानांना सर्च ऑपरेशनदरम्यान आढळून आला. 

टॅग्स :terroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीर