जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) अहवालानुसार दहा भारतीयांपैकी एकाला आयुष्यात कर्करोग होण्याचा धोका असून, तसेच पंधरापैकी एकाचा कर्करोगाने मृत्यू होऊ शकतो. जागतिक कर्करोग अहवालानुसार २०१८ मध्ये भारतात कर्करोगाचे नवीन ११.६ लाख रुग्ण आढळले. या अवधीत ७८४,८०० जणांचा कर्करोगाने मृत्यू झाला, तर गेल्या पाच वर्षांपासून २२ लाखांहून अधिक लोक कर्करोगाशी झुंज देत आहेत. एकूण भारताच्या १३५ कोटी लोकसंख्येभोवती कर्करोगाचा जीवघेणा विळखा घट्ट होत असल्याचे दिसते.
जागतिक आरोग्य संघटनेने कर्करोग दिन आणि कर्करोग विशेष संसोधन आंतरराष्ट्र्रीय संस्थेने (आयएआरसी) मंगळवारी दोन अहवाल जारी केले आहेत. एका अहवालाचा उद्देश कर्करोगासाठी जागतिक कार्यक्रम ठरविणे आहे, दुसरा अहवाल संशोधन आणि प्रतिबंध यावर भर देणारा आहे. या अहवालानुसार दहा भारतीयांपैकी एकाला कर्करोग होण्याचा धोका असून, पंधरा भारतीयांपैकी एकाचा कर्करोगाने मृत्यू होऊ शकतो.
भारतात मुख्यत्वे सहा प्रकारच्या कर्करोगाचे रुग्ण आढळतात. १ लाख ६२ हजार ५०० जणांना स्तनाचा कर्करोग असल्याचे आढळले. मुख कर्करोगाचे रुग्ण १ लाख २० हजार, तर ९७ हजार जण मणक्याचा कर्करोगाचे नवीन रुग्ण आढळले. पोटाच्या कर्करोगाचे ५७ हजार रुग्ण आढळले असून, आतडे-मलमार्ग कर्करोग्रस्तांची संख्या ५७ हजार आहे. फुफ्फु साचा कर्करोग झालेल्या नवीन रुग्णांची संख्या ६८ हजार आहे. एकूण कर्करोगाच्या नवीन रुग्णांच्या संख्येचे प्रमाण ४९ टक्के आहे.गुंतवणुकीचे प्रमाण वाढविण्यासह सर्वसंबंधितांनी एकत्र काम केल्यास येत्या एका दशकात ७० लाख लोकांना कर्करोगापासून वाचविता येऊ शकते, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालक ट्रेडॉम अॅडहनम गेब्रायसेस यांनी सांगितले.
अहवालानुसार जगात धूम्रपान करणाऱ्यांपैकी ८० टक्के धूम्रपान करणारे अल्प आणि मध्यम उत्पन्न देशांतील आहेत.पुरुषांत एकूण ५ लाख ७० हजार कर्करोगाचे नवीन रुग्ण आहेत. यात ९२ हजार मुखकर्करोग, ४९ हजार (फुफ्फु साचा कॅन्सर), ३९ हजार (पोटाचा कॅन्सर) आणि आतडे-मलमार्ग कॅन्सरच्या नवीन कर्करुग्णांची संख्या ३७ हजार आहे. भारतातील विकसित राज्यात आणि शहरी भागात आतडे-मलमार्ग कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे, तसेच स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाणही वाढत असल्याचे दिसते.
महिलांमध्ये ५ लाख ८७ हजार नवीन कॅन्सरचे रुग्ण आढळले आहेत. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये कॅन्सरचे १७ नवीन रुग्ण आहेत. तंबाखूमुळे भारतात कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. याचा संबंध सामजिक आणि आर्थिक स्थितीशी आहे. पुरुषांत प्रामुख्याने मुख कर्करोग आणि महिलांमध्ये मानेच्या मणक्याच्या कर्करोगाचे अधिक प्रमाण आहे.अल्प आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांत कर्करोग प्रतिबंध आणि नियंत्रण सेवा क्षेत्रातील कमी गुंतवणुकीमुळे २०४० पर्यंत कर्करुग्णांची संख्या ८१ टक्के वाढण्याची शक्यता आहे.जगभर धूम्रपान करणाऱ्यांपैकी ६४ टक्के लोक फक्त देशातील आहेत, तर जगभरात धूम्रपान करणाºया पुरुषांपैकी ५० टक्के लोक चीन, भारत, इंडोनेशियात आहेत.