शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

नियंत्रण रेषेवर पाकची नापाक हरकत; आयईडी स्फोटात १ जवान शहीद तर २ जण गंभीर जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2019 21:55 IST

या स्फोटात सैन्याच्या वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

जम्मू काश्मीर -  भारत आणि पाकिस्तान यांच्यातील झीरो लाईनवर पाकिस्तानकडून आयईडी स्फोट करण्यात आला. या स्फोटात पेट्रोलिंग करणारा भारतीय जवान शहीद झाला आहे तर अन्य दोन जण गंभीर जखमी आहेत. 

या स्फोटात सैन्याच्या वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनेनंतर संपूर्ण नियंत्रण रेषेवर दक्षता वाढविण्यात आली आहे. मात्र या घटनेसंदर्भात लष्कराकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य झालेले नाही. ही घटना रविवारी सकाळी 11 वाजता घडली. रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे लष्कराचे सैनिक घेऊन सीमावर्ती चौकांवर जात होते. दरम्यान, पाकिस्तानकडून कच्च्या रस्त्यावर आयईडी लावण्यात आले. यावर चढताच वाहनाचा पुढील टायर फुटला, ज्यामुळे गाडीच्या पुढचा भाग छिनविछिन्न झाला. या वाहनात सैन्याचे 4 कर्मचारी प्रवास करत होते, त्यातील तीन गंभीर जखमी आहेत. हवालदार संतोष आणि नायक जिमाराम या दोन गंभीर जखमी सैनिकांना विमानाने आर्मी कमांड हॉस्पिटल उधमपूर येथे उपचारासाठी दाखल केले आहे. 

कमांड हॉस्पिटल उधमपूर येथे तैनात डॉक्टरांनी हवालदार संतोषला मृत घोषित केले. जिमाराम यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. तिसरा जवान नायक कृष्णा प्रताप याच्यावर अखनूरच्या सैन्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

एलओसीवर शोध मोहीम घटनेनंतर एलओसीवर भारतीय जवानांना गस्त घालताना अतिरिक्त सतर्कता बाळगण्यास सांगितले आहे. पाकिस्तानच्या या नापाक कृत्याकडे पाहता एलओसीवर इतरत्र असे कोणतेही आयईडी स्थापित केले गेले आहे की नाही हे शोधण्यासाठीही शोधमोहीम राबविण्यात आली. नियंत्रण रेषेवरील या घटनेमुळे सीमा भागातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारतPakistanपाकिस्तानBlastस्फोटIndian Armyभारतीय जवान