शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेमध्ये एक लाख कर्मचा-यांची भरती, अपघातांनंतर मंत्रालयाला आली जाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 06:06 IST

वाढत्या अपघातांमुळे प्रवाशांत भीतीचे वातावरण असल्यामुळे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सुरक्षा श्रेणीतल्या रिक्त जागांवर १ लाख कर्मचा-यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

सुरेश भटेवरा नवी दिल्ली : वाढत्या अपघातांमुळे प्रवाशांत भीतीचे वातावरण असल्यामुळे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सुरक्षा श्रेणीतल्या रिक्त जागांवर १ लाख कर्मचा-यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. गोयल आणि रेल्वे बोर्डाचे अधिकारी यांच्यात रविवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत रेल्वे दुर्घटना टाळण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाची उपकरणे व आवश्यक साधन सामग्री तर हवीच, त्याचबरोबर कर्मचा-यांची कमतरता दूर करावी लागेल, ही बाब लक्षात आली.बैठकीत सुरक्षेबाबत जे निर्णय घेण्यात आले, त्यानुसार ज्येष्ठ रेल्वे अभियंत्यांची १00 टक्के पदे भरली जाणार आहेत. येत्या ३ महिन्यांत सहायक स्टेशन मास्तर व गार्ड यांची भरती होईल. ‘ग्रुप सी’मधील ५0 टक्के रिक्त पदे रेल्वे भरती बोर्डाद्वारे व ‘ग्रुप डी’तील निम्मी पदे आरआरबी व निम्मी पदे रेल्वे भरती प्रकोष्ठामार्फत भरली जाणार आहेत. म्हणजे ६५ हजार कर्मचा-यांची भरती आरआरसीमार्फत तर ३५ हजार कर्मचा-यांची भरती आरआरबीमार्फत केली जाणार आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्वनी लोहानी यांनी सांगितले की, रेल्वे सुरक्षेबाबत विभागवाद आडवा येणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. अधिका-यांनी सेक्शन इंजिनीअर्स, ज्युनिअर इंजिनीअर्स, ट्रॅकमन, चौकीदार आदींशी नियमित संवाद साधला पाहिजे. त्यांच्या समस्यांचे निराकरण केले पाहिजे. रेल्वे कार्यालये, वर्कशॉप्स, स्टाफ क्वार्टर्स, रनिंग रुम्स, रेस्ट हाउसेस, आरपीएफ बॅरॅक्स यांची तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.’>समाधानाची बाबया निर्णयाचे आॅल इंडिया रेल्वेमेन्स फेडरेशनचे महासचिव शिवगोपाल मिश्रांनी स्वागत केले आहे. ते म्हणाले की, सुरक्षा श्रेणीत दोन लाख पदे रिक्त आहेत. तथापि एक लाख पदे त्यात अशी आहेत की ज्यांच्याशिवाय रेल्वेचे दैनंदिन कामकाज चालूच शकत नाही. उशिरा का होईना रेल्वे व्यवस्थापनाला आमच्या मागण्यांची दखल घ्यावीशी वाटली आणि नव्या भरतीचे त्यांनी आदेश दिले ही समाधानाची बाब आहे. या भरतीनंतरही विविध झोनना सुरक्षा श्रेणीतील कर्मचा-यांची कमतरता भासल्यास, त्यांना रेल्वेच्या सेवानिवृत्त कर्मचा-यांना कंत्राटी पद्धतीने सेवेत घेण्याबाबत सुचवले आहे. वित्त व कार्मिक विभागाने स्वतंत्र पथके नियुक्त करून महिन्याभरात रेल्वे पेन्शनरांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा मार्ग शोधून काढावा, अशा सूचना देण्यात आल्या.