शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
3
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
4
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
5
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
6
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
7
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
8
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
11
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
12
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
13
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
14
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
15
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
16
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
17
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
18
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
19
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
20
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!

'मोदी 2.0' चे शंभर दिवसः देशाचा भूगोल आणि भविष्य बदलवणारे सात महत्वपूर्ण निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2019 11:32 IST

कलम 370 पासून तिहेरी तलाक, रस्ते सुरक्षा आणि दहशतवादाला चाप असे अनेक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले. 

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाला 100 दिवस पूर्ण होत आहेत. या 100 दिवसांत मोदी सरकारने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. अनेकांचा विरोध डावलून नरेंद्र मोदींनी घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे केंद्र सरकारच्या कामाचं कौतुक तर दुसरीकडे टीका होताना पाहायला मिळत आहे.  कलम 370 पासून तिहेरी तलाक, रस्ते सुरक्षा आणि दहशतवादाला चाप असे अनेक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले. 

तिहेरी तलाक बंदी कायदापंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांचा सत्तेत आल्यानंतर सर्वप्रथम मुस्लिमांमध्ये सुरु असणारी तिहेरी तलाक प्रथा बंद करून मुस्लिम समाजातील महिलांना न्याय देण्याचं काम केलं. तिहेरी तलाक बंदी कायदा लोकसभा आणि राज्यसभेत पारित करण्यात आला. त्यामुळे 1 ऑगस्टपासून या विधेयकाचा कायद्यात रुपांतर झालं. राज्यसभेत बहुमत नसताना तिहेरी तलाक पारित करून घेण्यात नरेंद्र मोदी सरकारला यश आलं. तिहेरी तलाक बंदी कायदा आणत मोदी सरकारने मुस्लिम महिलांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. 

कलम 370 हटविणेमोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय म्हणून कलम 370 हटविण्याकडे पाहिलं जातं. जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटविण्याचा धाडसी निर्णय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. तसेच जम्मू काश्मीर राज्याचं विभाजन करून लडाख हे स्वतंत्र केंद्रशासित राज्य स्थापन केलं. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे देशात एक देश एक कायदा लागू झाला. 

नवीन मोटार वाहन कायदा वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात केंद्र सरकारने कठोर कायदा आणला आहे. या अंतर्गत नियम मोडल्यास होणाऱ्या दंडाची रक्कम दहापटीने वाढविण्यात आली आहे. नवीन मोटार वाहन कायदा देशात 1 सप्टेंबरपासून लागू करण्यात आला आहे. अनेकांना या कायद्यावर नाराजी दाखविली असली तरी वाहन चालकांना शिस्त बसविण्यासाठी आणि रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी असा कठोर निर्णय घेणे गरेजेचे आहे असं सरकारकडून सांगण्यात आलं. 

UAPA कायद्यात सुधारणाबेकायदा प्रतिबंधक हालचाली सुधारणा(UAPA) विधेयकाला संसदेने मंजुरी दिली आहे. या विधेयकाला मंजुरी मिळाल्यामुळे NIAला जास्तीत जास्त अधिकार मिळणार असून, संघटनेबरोबरच एखाद्या व्यक्तीलाही दहशतवादी घोषित करता येणार आहे. UAPA विधेयकानुसार ज्या व्यक्तीला दहशतवादी घोषित करण्यात येईल, त्याची संपत्ती जप्त केली जाणार आहे. तसेच त्या संबंधित व्यक्तीच्या देश-विदेशातील दौऱ्यांवर प्रतिबंध घातले जाणार आहेत.

बँकांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय अर्थव्यवस्थेला संकटातून बाहेर काढण्यासाठी 10 सरकारी बँकांचे विलीनीकरण करून चार बँकांची निर्मिती करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. मोजक्याच, पण जागतिक आकाराच्या मजबूत बँकांची निर्मिती करण्याच्या नियोजित धोरणानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. विलीनीकरणानंतर सरकारी बँकांची संख्या 12 होईल. 

जलशक्ती मंत्रालयाची स्थापनापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीत आश्वासन दिलं होतं की, पाण्याबाबतचे जे मुद्दे असतील ते सोडविण्यासाठी स्वतंत्र मंत्रालयाची निर्मिती करण्यात येईल. त्यामुळे मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर जल संधारण आणि पेयजल आणि स्वच्छता मंत्रायलाच एकत्र गठन करून जलशक्ती मंत्रालय बनविण्यात आलं आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावं यासाठी जलशक्ती अभियान देशातील 256 जिल्ह्यात सुरु करण्यात आलं आहे. पाण्याचं संरक्षण करून त्याचा योग्य वापर करण्याचं महत्वपूर्ण काम या मंत्रालयाकडे आहे. 

मिशन फिट इंडिया देशाची सुदृढ पिढी निर्माण करण्यावर भर देण्यासाठी पंतप्रधानांनी ‘फिट इंडिया मुमेंट’ ची सुरुवात केली आहे. या अंतर्गत शाळा, कॉलेज, जिल्हा आणि स्थानिक स्तरावर हे अभियान राबविण्यात येणार आहे. फिट इंडिया अभियान यशस्वी करण्यासाठी क्रीडा मंत्रालय, मनुष्यबळ विकास मंत्रालय हे स्थानिक ग्रामीण विकास मंत्रालयासोबत मिळून एकत्र काम करत आहे. 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी