शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘वन डिस्ट्रिक्ट-वन प्रॉडक्ट’ योजनेसाठी केंद्र देणार साह्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2020 04:17 IST

रब्बी हंगामात शेतकऱ्यांना एखादे पीक व्यापक प्रमाणात घेऊन चांगली किंमत मिळविण्यास प्रोत्साहित करावे, यासाठी ही योजना आणण्याचा सरकारचा विचार आहे.

नवी दिल्ली : कृषिक्षेत्रात ‘वन डिस्ट्रिक्ट-वन प्रॉडक्ट’ योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या राज्यांना बाजारपेठा मिळवून देण्यासाठी साह्य करण्याचा विचार केंद्र सरकार करीत आहे.सूत्रांनी सांगितले की, रब्बी हंगामात शेतकऱ्यांना एखादे पीक व्यापक प्रमाणात घेऊन चांगली किंमत मिळविण्यास प्रोत्साहित करावे, यासाठी ही योजना आणण्याचा सरकारचा विचार आहे. उदा. कर्नाटकात रागी, तामिळनाडूत सूर्यफूल आणि राजस्थानात मोहरी यासारख्या पिकांचे क्षेत्र विकसित करता येऊ शकेल. गुंटूरची मिरची आणि रत्नागिरीचा हापूस जसा प्रसिद्ध आहे, तशीच अनेक पिके काही ठरावीक जिल्ह्यांशी जोडलेली आहेत. त्यांना ‘जीआय’ पिके म्हणतात. हे जिल्हे या ठरावीक पिकांसाठी खास विकसित केले जाऊ शकतात. त्यामुळे त्यात आणखी सुधारणा होतील.देशात ५४० जिल्हे असून, त्यातील १०० जिल्ह्यांत जीआय टॅग असलेली पिके आहेत. त्यांचा लाभ घेतला जाऊ शकतो. त्यासाठी ‘वन डिस्ट्रिक्ट-वन प्रॉडक्ट’ ही योजना आहे. एखादे पीक अथवा फळ एखाद्या जिल्ह्यात व्यापक प्रमाणात घेतले जात असेल, तर त्याला विशेष प्रोत्साहन देऊन गुणवत्तेत आणखी वाढ करणे हा योजनेचा उद्देश आहे.सूत्रांनी सांगितले की, राज्य सरकारे ठरावीक पिकाला ठरावीक जिल्ह्यात प्रोत्साहित करीत असतील, तर त्यासाठी केंद्र सरकार आवश्यक बाजार जोडणी उपलब्ध करून देईल. त्यांना प्रक्रिया करणारे उद्योजक आणि निर्यातदार पुरविले जातील. ही उत्पादने शेतकºयांकडून थेट खरेदी केली जातील. शेतकरी उत्पादक संघटनांच्या मार्फत हे व्यवहार होतील.एका अधिकाºयाने सांगितले की, या योजनेची अंमलबजावणी आणि निगराणी यासाठी लवकरच एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. शेतकºयांना अधिक चांगली किंमत मिळावी, यासाठी आमचा हा प्रयत्न आहे.देशात ५४0 जिल्हे असून, त्यातील १00 जिल्ह्यांत जीआय टॅग असलेली पिके आहेत. त्यांचा लाभ घेतला जाऊ शकतो. त्यासाठी ‘वन डिस्ट्रिक्ट-वन प्रॉडक्ट’ ही योजना आहे. एखादे पीक अथवा फळ एखाद्या जिल्ह्यात व्यापक प्रमाणात घेतले जात असेल, तर त्याला विशेष प्रोत्साहन देऊन गुणवत्तेत वाढ करणे हा योजनेचा उद्देश आहे.