दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू
By admin | Updated: December 13, 2015 00:07 IST
काटोल : दुचाकी स्लिप झाल्याने मागे बसलेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर आरोपी दुचाकीचालक गंभीर जखमी झाला. जखमीवर नागपूर येथील मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहे. अपघाताची ही घटना रविवारी (दि.६) रात्री ८ वाजताच्या सुमारास काटोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डोंगरगाव शिवारात घडली.
दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू
काटोल : दुचाकी स्लिप झाल्याने मागे बसलेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर आरोपी दुचाकीचालक गंभीर जखमी झाला. जखमीवर नागपूर येथील मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहे. अपघाताची ही घटना रविवारी (दि.६) रात्री ८ वाजताच्या सुमारास काटोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डोंगरगाव शिवारात घडली.प्रदीप रामचंद्र ढोणे (३३, रा. सावनेर) असे मृत तरुणाचे नाव आहे तर राजकुमार भगवान मोरे, असे आरोपी दुचाकीचालकाचे नाव आहे. आरोपी राजकुमार याने आपली एमएच-४०/एम-५१७६ क्रमांकाची दुचाकी निष्काळजीपणे चालवून भरधाव पळविली. यात दुचाकी स्लिप झाल्याने त्याच्या दुचाकीवर मागे बसलेला तरुण खाली पडून गंभीर जखमी झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर आरोपी दुचाकीचालक हा जखमी झाला. या प्रकरणी फिर्यादी निर्मला कृष्णाजी ढोले (६५, रा. वरुड, जि. अमरावती) यांच्या तक्रारीवरुन काटोल पोलिसांनी आरोपी दुचाकीचालकाविरुद्ध भादंवि कलम २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास हवालदार दीक्षित करीत आहेत.....पादचारी वृद्धेस चिरडलेभिवापूर : अज्ञात वाहनचालकाने पादचारी वृद्ध महिलेस जबर धडक दिल्याने वृद्धेचा मृत्यू झाला. ही घटना भिवापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मानोरा शिवारात शुक्रवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.अनुबाई अर्जुन भारणे (७२, रा. उमरेड) असे मृत वृद्धेचे नाव आहे. अनुबाई ही मानोरा शिवारातील रस्त्याने पायी जात होती. दरम्यान, अज्ञात वाहनाने तिला जोरदार धडक दिली. यात गंभीर जखमी झाल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या प्रकरणी भिवापूर पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध भादंवि कलम २७९, ३०४ (अ) नुसार गुन्हा नोंदवून आरोपी वाहनचालकाचा शोध सुरू केला आहे. पुढील तपास हवालदार कोडापे करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)