शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कोसी नदीवर बांधण्यात येणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या पुलाचा भाग कोसळला; एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2024 10:20 IST

कोसी नदीवर बांधण्यात येत असलेल्या देशातील सर्वात मोठ्या पुलाचा काही भाग कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

बिहारमधील सुपौल येथे कोसी नदीवर बांधण्यात येत असलेल्या देशातील सर्वात मोठ्या पुलाचा काही भाग कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुलाच्या 50, 51 आणि 52 क्रमांकाच्या पिलरचे गार्टर जमिनीवर कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून 9 जण जखमी झाले. ढिगाऱ्याखाली 20 हून अधिक लोक दबले असण्याची शक्यताही स्थानिकांनी व्यक्त केली आहे. 

सुपौलमधील बकौर आणि मधुबनीतील भेजा घाट दरम्यान भारतातील सर्वात मोठा पूल बांधला जात आहे. या घटनेनंतर स्थानिक लोक प्रचंड संतापले आहेत. बकौर ते भेजादरम्यान पुलाचा गार्टर कोसळल्यानंतर अद्याप मदतकार्य सुरू करण्यात आलेले नाही. प्रशासनाचे पथक पोहोचले आहे, परंतु हे मध्यभागी झाल्याने, पुरेशी उपकरणं घटनास्थळी पोहोचू शकत नाहीत. अशा परिस्थितीत मदत आणि बचावकार्यात अनेक अडचणी येत आहेत. 

सुपौल जिल्ह्यातील बकौर आणि मधुबनी जिल्ह्यातील भेजा दरम्यान बांधण्यात येत असलेल्या देशातील सर्वात लांब (10.2 किमी) महासेतूचं बांधकाम वेगाने सुरू आहे. हा महासेतू केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाकडून 1199 कोटी 58 लाख रुपये खर्च करून बांधण्यात येत आहे.

या पुलाचे बांधकाम ऑगस्ट 2023 पर्यंत पूर्ण करण्याचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. मात्र जे आता 2024 च्या अखेरीस पूर्ण करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. आतापर्यंत पुलाचं 56 टक्के काम पूर्ण झाले आहे. एकूण 171 पिलर असणार असून त्यापैकी 166 हून अधिक पिलर पूर्ण झाले आहेत. या पुलावर एकूण तीन किलोमीटरचा ॲप्रोच रोड तयार करण्यात येत आहे.  

टॅग्स :Biharबिहार