शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

मणिपूरमध्ये पुन्हा संघर्ष गोळीबारात एकाचा मृत्यू; जमावाचा हल्ला, बीएसएफचे ३ जवान जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 08:21 IST

या घटनेत टी. मनोरंजन या स्वयंसेवकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या निषेधार्थ गुरुवारी मोठ्या संख्येने महिलांनी इंफाळमध्ये मोर्चा काढला हाेता.

इंफाळ : मणिपूरच्या कांगपोकपी जिल्ह्यात दोन समुदायांमध्ये झालेल्या गोळीबारात गावातील एका स्वयंसेवकाचा मृत्यू झाला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली. दरम्यान, थौबल येथे जमावाच्या हल्ल्यात बीएसएफचे ३ जवान जखमी झाल्यानंतर तेथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

बुधवारी रात्री संशयित अतिरेक्यांनी शेजारच्या डोंगराळ भागातून कांगचूपवर गोळीबार केला. सखल भागातील गावातील स्वयंसेवकांनी त्यांना प्रत्युत्तर दिले.बुधवारी रात्री इंफाळ खोऱ्यात आणि डोंगराळ भागात अनेक ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडल्या, त्यातीलच ही घटना आहे.

या घटनेत टी. मनोरंजन या स्वयंसेवकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या निषेधार्थ गुरुवारी मोठ्या संख्येने महिलांनी इंफाळमध्ये मोर्चा काढला हाेता.

अनेक जण जखमीइंफाळ पश्चिम जिल्ह्यातील फयेंग, कडंगबंद आणि कौत्रुक, इंफाळ पूर्वेतील सगोलमांग, कांगपोकपीमधील सिनम कोम इत्यादी ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडल्या.  सुरक्षा दलांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. या गोळीबारात अनेक जण जखमी झाले. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार