शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

जावयाच्या हत्येसाठी एक कोटीची सुपारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2018 00:39 IST

हैदराबादेत आॅनर किलिंग; सात अटकेत

हैदराबाद : आपली मुलगी अमृता हिच्याशी प्रेमविवाह केल्याचा राग मनात ठेवून तिचे वडील टी. मारुती राव यांनी जावई पेरुमला प्रणय याची मारेकऱ्यांकरवी हत्या केली. या आॅनर किलिंगच्या प्रकरणात मिर्यालगुडा पोलिसांनी मंगळवारी सात जणांना अटक केली असून, त्यामध्ये गुजरातचे माजी गृहराज्यमंत्री हरेन पंड्या यांच्या हत्या प्रकरणात निर्दोष सुटलेल्या दोघा इसमांचाही समावेश आहे.याप्रकरणी अटक केलेल्या सात जणांमध्ये मुलीचे वडील, मोहंमद अब्दुल बारी, अब्दुल करीम, टी. श्रवण, असगर अली, समुद्रल शिवा यांचाही समावेश आहे. मुलीच्या वडिलांनी जावयाच्या हत्येसाठी एक कोटी रुपयांची सुपारी दिली होती. त्यापैकी १५ लाख रुपये हत्येच्या आधी मारेकºयांना दिले होते. या हत्येचे हैदराबादमध्ये तीव्र पडसाद उमटले. दलित संघटनांनी या प्रकाराविरोधात जोरदार निदर्शने केली.दलित ख्रिश्चन असलेल्या आपल्या जावयाची धारदार चाकूने हत्या करणाºया सुभाष शर्माला पोलिसांनी बिहारमधून अटक केली आहे. प्रणय व अमृता वर्षिनी हे दोघे शाळेपासून एकमेकांना ओळखत होते. त्यांचे एकमेकांवर प्रेम होते. यंदा जानेवारीत अमृताने घर सोडले आणि प्रणयशी विवाह केला. तिच्या वडिलांना हा विवाह मान्य नव्हता. विवाहानंतर हे दाम्पत्य मिर्यालगुदाला राहायला आले. त्यावेळी त्या दोघांच्या जिवाला धोका असल्याची जाणीव स्थानिक पोलिसांनी करून दिली होती. त्यांना घरी सीसीटीव्ही लावायला सांगितले होते.वर्षिनी ही सध्या गरोदर आहे. जातिप्रथा संपणे गरजेचे आहे; अन्यथा असे प्रकार घडत राहतील, असे सांगून, पतीच्या मारेकºयांना शिक्षा व्हावी, यासाठी आपण प्रयत्न करीत राहू, असे तिने म्हटले आहे. पतीच्या हत्येमुळे आपण घाबरलेलो नाही. पेरुमला प्रणय याची पत्नी म्हणूनच यापुढे जगणार आहोत, असेही ती म्हणाली. (वृत्तसंस्था)मागितले अडीच कोटीमुलीचे वडील टी. मारुती राव हे अब्दुल करीमला २०११ पासून ओळखत होते. प्रणयची हत्या करण्यासाठी त्यांनी जुलैमध्ये करीमला हाताशी धरले. करीमने मोहंमद अब्दुल बारी व असगर अली यांना ही सुपारी देण्याचे ठरविले. हत्येसाठी या दोघांनी अडीच कोटी रुपये मागितले. मात्र, त्यांना १ कोटी रुपये देण्याचे ठरले. मारुती रावने त्यातील १५ लाख रुपये या दोघांना आगाऊ दिले होते.

टॅग्स :Honor Killingऑनर किलिंग