बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगल्याप्रकरणी एकाला अटक
By admin | Updated: August 11, 2015 22:11 IST
पुणे : बेकायदेशीरत्यिा पिस्तुल व ४ जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी एका तरूणाला कोथरूड पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला १४ ऑगस्टपर्यत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगल्याप्रकरणी एकाला अटक
पुणे : बेकायदेशीरत्यिा पिस्तुल व ४ जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी एका तरूणाला कोथरूड पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला १४ ऑगस्टपर्यत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.आकाश अशोक शेजवळ (वय २१, रा. मंगळवार पेठ) असे आरोपीचे नाव आहे. १० ऑगस्ट रोजी कसबा पेठ परिसरात सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. शेजवळ हा या परिसरात देशी बनावटीचे पिस्तुल व ४ जिवंत काडतुसे घेऊन मोटारसायकलवरून जात असताना पोलिसांना आढळला. त्यानुसार त्याला अटक केली. तो सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरूद्ध गुन्हे दाखल आहेत.