शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

एकाच दिवशी उघडली दीड कोटी बँक खाती

By admin | Updated: August 29, 2014 02:40 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक अस्पृश्यता संपविण्याचा नारा देत महत्त्वाकांक्षी आर्थिक समावेशन मिशन ‘जन-धन योजनेचा’ शुभारंभ केला

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक अस्पृश्यता संपविण्याचा नारा देत महत्त्वाकांक्षी आर्थिक समावेशन मिशन ‘जन-धन योजनेचा’ शुभारंभ केला. या योजनेंतर्गत सर्व गरिबांना बँक खाती पुरविली जातील. उद्घाटनाच्या दिवशी गुरुवारी देशभरात १.५ कोटी खाती उघडण्याचा विक्रम नोंदला गेला. बहुदा जगभरात कधीही एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात बँक खाती उघडली गेली नसावी. सरकार स्थापन झाल्यानंतर १०० दिवसांत नवी योजना आणताना मोदी म्हणाले की, २६ जानेवारी २०१५ पर्यंत या योजनेंतर्गत ७.५ कोटी लोकांना सामावून घेतले जातील. त्यांना रुपे- डेबिट कार्डवर शून्य रुपये जमा असतानाही बँक खाते दिले जाईल. त्यांना १ लाख रुपयांचा अपघाती विमा आणि ३० हजार रुपयांचा आयुर्विमाही दिला जाईल. नंतर त्यांना ५ हजार रुपयांचा ओव्हरड्राफ्ट देण्याची सुविधा असेल.यूएसएसडी प्लॅटफॉर्म...मोदींनी बेसिक जीएसएम मोबाईल फोनच्या माध्यमातून बँकिंग सेवा उपलब्ध करण्यासाठी राष्ट्रीय एकीकृत ‘यूएसएसडी प्लॅटफॉर्म’ देशाला समर्पित केला. आपण सर्वांनी मिळून लढा दिला तर गरिबीपासून मुक्ती मिळेल. देशाचा प्रत्येक नागरिक अर्थव्यवस्थेला जोडला गेला तरच गरिबीचा नायनाट करता येईल. सरकार आणि सरकारी संपत्ती गरिबांसाठीच आहे. देशातील ४० टक्के लोक आर्थिक अस्पृश्यतेचे शिकार बनले आहेत,असेही मोदी म्हणाले.सावकारी पाशातून सोडवणार...श्रीमंत आणि उद्योगपतींना कमी दरात कर्ज मिळते, मात्र गरिबांना पाचपेक्षा जास्त पटीने सावकारांकडून कर्ज घ्यावे लागते. एखादी व्यक्ती एकदा का सावकाराच्या पाशात अडकली की आयुष्यभर बाहेर पडणे अशक्य होते. या स्थितीमुळे अशा लोकांवर आत्महत्येची वेळ येते असेही मोदींनी म्हटले.देश आर्थिक महाशक्ती बनेल- राजनाथसिंहचीन आणि अमेरिकेच्या बरोबरीने भारत जगात आर्थिक महाशक्ती बनेल, असा विश्वास केंद्रिय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी ‘जनधन’ योजनेचा लखनौ येथे प्रारंभ करताना व्यक्त केला. सरकारने ज्या पद्धतीने योजना सुरू केल्या ते पाहता जगातील तीन आर्थिक महासत्तांमध्ये भारताचा समावेश होईल, असा मला विश्वास आहे. या योजनेमुळे जनतेत ओळख मिळाल्याची भावना बळावेल आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवता येईल, असेही ते म्हणाले.(लोकमत न्यूज नेटवर्क)