शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Omicron Variant: ओमायक्रॉनची भीती! मध्य प्रदेशात जर्मन नागरिकानं वाढवलं टेन्शन; लग्न सोहळ्यात हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 06:33 IST

कोरोना पाॅझिटिव्ह, केरळात १० पैकी ८ रुग्णांना ओमायक्राॅन नाही

जबलपूर : काेराेना विषाणूच्या ओमायक्राॅन व्हेरिएंटने सर्वांची चिंता वाढविली आहे. मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये एका जर्मन नागरिकाला काेराेनाचा संसर्ग झाला असून त्याच्या घशातील स्रावाचे नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जर्मन नागरिक एका विवाह समारंभात सहभागी हाेण्यासाठी आला हाेता. ताे नवी दिल्लीमार्गे जबलपुरात दाखल झाला हाेता. 

विमानतळावर अँटिजेन चाचणी करण्यात आली. ती निगेटिव्ह आली हाेती. मात्र, आरटी-पीसीआर चाचणी पाॅझिटीव्ह आली. त्याला विलगीकरणात ठेवण्यात आले असून त्याच्या संपर्कातील ५० जणांचे नमुने गाेळ करण्यात आले आहेत. मध्य प्रदेशात आतापर्यंत ओमायक्राॅन व्हेरिएंटचा एकही रुग्ण आढळलेला नाही. दरम्यान, केरळमध्ये धाेकादायक देशांमधून आलेल्या १० पैकी ८ काेराेनाबाधित रुग्णांना ओमायक्राॅनचा संसर्ग झालेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांचे नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले हाेते. दाेघांचे अहवाल लवकरच प्राप्त हाेतील, अशी अपेक्षा आराेग्यमंत्री वीणा जाॅर्ज यांनी सांगितले.

जहाज रवाना...अमेरिकेतील न्यू ऑरलियन्स येथे एका क्रूझ जहाजावरील प्रवासी आणि चालक दलातील सदस्यांसह १७ जणांना काेराेनाचा संसर्ग झाला हाेता. ते जहाज नव्या प्रवाशांसह सफरीसाठी रवाना झाले आहे. नाॅर्वेजियन बेकअवे असे या क्रूझचे नाव आहे. बाधितांपैकी काेणामध्येही लक्षणे नव्हती. संपूर्ण लसीकरण झालेल्यांनाच क्रूझमध्ये प्रवेश करण्याची परवानगी आहे. क्रूझमध्ये ३९६३ प्रवासी वाहून नेण्याची क्षमता आहे.

नव्या व्हेरिएंटचा अंदाज हाेताच : रामाफाेसादक्षिण आफ्रिकेत काेराेनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ हाेत आहे. त्याबाबत राष्ट्रपती सिरिल रामफाेसा यांनी चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले, की चौथी लाट आणि नव्या व्हेरिएंटचा अंदाज हाेताच. ओमायक्राॅनबाबत दक्षिण आफ्रिकेसाेबत जगभरातील शास्त्रज्ञ संशाेधन करत आहेत तरीही नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे. तसेच लाॅकडाऊनसारख्या कठाेर नियमांची अंमलबजावणी करण्यापूर्वीच मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे रामाफाेसा म्हणाले.

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्या