शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात गुंड नीलेश घायवळच्या मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठीचा पैसा कुठून आला? तपास होणार!
2
जालना मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांना अटक; १० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं!
3
एकरकमी ३७५१ पहिली उचल टाका, मगच ऊसाला कोयता; राजू शेट्टी यांनी स्पष्ट केली भूमिका
4
DIGच्या घरात सापडलं घबाड, नोटा मोजण्यासाठी मागवावी लागली मशीन, CBIची मोठी कारवाई  
5
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
6
बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाहांचं सस्पेन्स वाढवणारं विधान, नितिश कुमारांबाबत म्हणाले...
7
ऑस्ट्रेलियन भूमीवर वनडेत सर्वाधिक षटकार कोणी मारले? पहिलं नाव पाहून खूश व्हाल!
8
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
9
कर्मचारीच द्यायचा टिप, मग फ्लिपकार्टच्या ट्रकमधील वस्तूंवर मारायचे डल्ला, ७ जण अटकेत, २२६ मोबाईल जप्त  
10
रणजी ट्रॉफी स्पर्धेत 'जर्सी' चित्रपटाचा ट्रेलर! मुंबईकरांवर भारी पडला जम्मू-काश्मीरचा ४० वर्षीय कॅप्टन
11
डीएसएलआर कॅमेऱ्याला टक्कर देणारी ओप्पो फाइंड एक्स ९ सीरीज लॉन्च; जाणून घ्या किंमत!
12
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
13
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
14
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
15
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
16
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
17
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
18
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
19
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
20
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले

Omicron Variant : चिंता वाढली! कर्नाटकानंतर आता गुजरातमध्ये आढळला ओमायक्रॉनचा रुग्ण, दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या व्यक्तीला लागण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2021 15:24 IST

Omicron Variant : भारतही कोरोनाच्या नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंट संसर्गाची (Omicron in India) लागण झालेल्या देशांच्या यादीत सामील झाला आहे.

अहमदाबाद : दक्षिण आफ्रिकेत आढळलेला कोरोना व्हायरसचा (Coronavirus) नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनमुळे चिंता वाढली आहे. गुरुवारी (दि.03) कोरोना कर्नाटकात ओमायक्रॉन व्हेरिएंट संक्रमित (Omicron Infection) दोन रुग्ण आढळले आहेत. यानंतर आता गुजरातमध्येही (Gujarat) एक रुग्ण ओमायक्रॉन संक्रमित असल्याचे सांगण्यात येत आहे. शनिवारी, गुजरातमधील जामनगरमध्ये (Jamnagar)  एका व्यक्तीला ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण झाल्याचे आढळून आले आहे. ही व्यक्ती दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतली होती. त्यामुळे भारतही कोरोनाच्या नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंट संसर्गाची (Omicron in India) लागण झालेल्या देशांच्या यादीत सामील झाला आहे.

संपूर्ण जगात धास्ती निर्माण करणाऱ्या ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने अखेर भारतात प्रवेश केल्याचे गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले. ओमायक्रॉनची बाधा झालेले दोन रुग्ण कर्नाटकात आढळून आले. कर्नाटकात ओमायक्रॉनचा संसर्ग झालेला एक रुग्ण 66 वर्षांचा आहे तर दुसरा 46 वर्षांचा आहे. त्यापैकी एक दक्षिण आफ्रिकेचा नागरिक आहे, तर दुसरा स्थानिक डॉक्टर आहे. दरम्यान, एका बाधिताच्या संपर्कात आलेल्या पाच जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निदर्शनास आले आहे. 

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने ओमायक्रॉनबद्दल चिंता व्यक्त केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या या व्हेरिएंटला सर्वात संसर्गजन्य असल्याचे म्हटले आहे. दक्षिण आफ्रिकेत या व्हेरिएंटचा रुग्ण सर्वात आधी सापडला होता. दक्षिण आफ्रिकेशिवाय जगातील काही देशांमधून ओमायक्रॉनची प्रकरणे वाढत आहेत. आतापर्यंत 30 हून अधिक देश या नवीन व्हेरिएंटच्या कचाट्यात आले आहेत. त्यामुळे जगातील अनेक देशांनी आफ्रिकी देशांतून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध घातले आहेत.

ओमायक्रॉन व्हेरिएंटबद्दल आतापर्यंत काय माहिती आहे?दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोना व्हायरसच्या नवीन व्हेरिएंटला B.1.1529 असे ओळखले जात होते. नंतर जागतिक आरोग्य संघटनेने त्याला ‘Omicron’ असे नाव दिले. हा ग्रीक शब्द आहे (Omicron is a Greek word).जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले की, ज्या पहिल्या नमुन्यातून ओमायक्रॉनची पहिली केस आढळली होती, त्याची चाचणी 9 नोव्हेंबर रोजी करण्यात आली होती. तसेच, या कोरोनाच्या व्हायरसचा समावेश जागतिक आरोग्य संघटनेने 'Variant of Concern' म्हणजेच काळजी करण्याजोग्या व्हेरिएंटच्या यादीत केला आहे.

किती धोकादायक आहे?कोरोनाचा ओमायक्रॉन हा व्हेरिएंट डेल्टासारखा धोकादायक आहे की नाही, या प्रश्नाचे उत्तर सध्यातरी येणे बाकी आहे. सध्या जगभरातील शास्त्रज्ञ या व्हाययरच्या संभाव्यतेचा अभ्यास करत आहेत. सुत्रांच्या म्हणण्यानुसार, व्हायरसबद्दल सर्व काही जाणून घेण्यासाठी एक ते दोन आठवडे लागतील. जागतिक आरोग्य संघटनेकडेही या व्हेरिएंटबद्दल फारशी माहिती नाही. दरम्यान, या ओमायक्रॉनला चिंतेचा व्हेरिएंट म्हणून संबोधले जात असले तरी, जागतिक आरोग्य संघटने म्हटले होते की, हे आधीच्या व्हेरिएंटपेक्षा जास्त संसर्गजन्य आहे.

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनGujaratगुजरातcorona virusकोरोना वायरस बातम्या