शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

Omicron Variant : ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्र सरकार सतर्क; राज्यांना परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2021 21:37 IST

Omicron Variant: कोविड चाचण्या आणि पाळत ठेवणे, इन्फ्लूएंझा सारखे आजार आणि श्वसनाचे आजार आणि आरटी-पीसीआर चाचणी करणे आवश्यक आहे.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे जगभरात एक नवीन भीती निर्माण झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या व्हेरिएंटला चिंताजनक म्हटले आहे आणि सर्व देशांना सावध राहण्यास सांगितले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून भारत सरकारने आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणांवरील स्थगितीचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर, केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यास आणि नवीन प्रकरणांच्या क्लस्टरवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा स्तरावर उपाययोजना करण्यास सांगितले आहे. 

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले की, गेल्या दोन आठवड्यात केरळ, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, पुद्दुचेरी, मणिपूर, पश्चिम बंगाल आणि नागालँडमधील 19 जिल्ह्यांमध्ये संसर्गाचे प्रमाण पाच ते दहा टक्क्यांच्या दरम्यान आहे. ते म्हणाले की, मिझोराम, केरळ आणि सिक्कीममधील आठ जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन आठवड्यात कोविड संसर्गाचे प्रमाण 10 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

याचबरोबर, 10 राज्यातील  27 जिल्ह्यांवर बारीक नजर ठेवण्याची गरज आहे, असे राजेश भूषण यांनी पत्रात लिहिले आहे. ते म्हणाले की, या संदर्भात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवणे आणि कोविड -19 च्या नवीन प्रकरणांच्या क्लस्टरवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा स्तरावर उपाययोजना करणे आवश्यक आहे. जर एखाद्या जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत असेल किंवा संसर्गाचे प्रमाण वाढत असेल, तर कंटेनमेंट झोनच्या रुपरेषेनुसार स्थानिक नियंत्रण सुरू केले पाहिजे, असे राजेश भूषण म्हणाले.

रात्री कर्फ्यूसारख्या उपाययोजना राबविण्याच्या सूचनाज्या भागात संसर्गाचे प्रमाण 10 टक्क्यांहून अधिक आहे किंवा रुग्णालयांतील 60 टक्के खाटा कोविड-19 रुग्णांनी भरलेल्या आहेत किंवा आयसीयूमध्ये 60 टक्क्यांहून अधिक खाटा रुग्ण आहेत, तेव्हा रात्रीचा कर्फ्यू, लोकांच्या येण्या-जाण्यावर निर्बंध, गर्दीवर निर्बंध (सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक, सण संबंधित), विवाहसोहळे आणि अंत्यविधीमध्ये लोकांची उपस्थिती मर्यादित करण्यासाठी धोरणात्मक पावले उचलली पाहिजेत, असे राजेश भूषण म्हणाले.

याचबरोबर, कोविड चाचण्या आणि पाळत ठेवणे, इन्फ्लूएंझा सारखे आजार आणि श्वसनाचे आजार आणि आरटी-पीसीआर चाचणी करणे आवश्यक आहे. कोविड-19 च्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी राज्य स्तरावर नियमित पावले उचलली जावीत, असेही राजेश भूषण यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉन