शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

Omicron : ओमायक्रॉनचा संसर्ग वाढल्यास निर्बंध लागू करा, केंद्रीय गृह खात्याकडून सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 06:46 IST

Omicron : अजय भल्ला यांनी म्हटले आहे की, ओमायक्रॉनचा मोठ्या प्रमाणावर संसर्ग झालेल्या देशांमध्ये रुग्णसंख्याही झपाट्याने वाढत  आहे. 

नवी दिल्ली : ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग व कोरोना रुग्णसंख्या यांच्यात जिथे वाढ होत असेल, तिथे राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी स्थानिक स्तरावर कडक निर्बंध लागू करावेत. तसेच ख्रिसमस व नववर्ष स्वागत समारंभातील गर्दीवर नियंत्रण राखावे, अशा सूचना केंद्रीय गृह खात्याचे सचिव अजय भल्ला यांनी सोमवारी पुन्हा दिल्या आहेत.त्यांनी म्हटले आहे की, राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी अतिशय सतर्क राहणे आवश्यक आहे. चाचणी, रुग्णांचा शोध, लसीकरण, उपचार व प्रतिबंधक नियमांचे पालन या पंचसूत्रीचा वापर करूनच कोरोना संसर्गाचा प्रसार रोखता येईल. ओमायक्रॉनची संसर्गशक्ती ही डेल्टापेक्षा तीनपट अधिक आहे. त्यामुळे कोरोना उपचार यंत्रणेपुढे नवीन आव्हान निर्माण झाले आहे. अजय भल्ला यांनी म्हटले आहे की, ओमायक्रॉनचा मोठ्या प्रमाणावर संसर्ग झालेल्या देशांमध्ये रुग्णसंख्याही झपाट्याने वाढत आहे. 

९ रुग्णांच्या संपर्कातील १६४ जणांची चाचणीमध्य प्रदेशच्या इंदूरमधील ओमायक्रॉनच्या ९ रुग्णांच्या संपर्कात आलेल्या १६४ जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्याचे अहवाल हाती येईपर्यंत या लोकांना विलगीकरणात राहण्यास सांगण्यात आले आहे. ओमायक्रॉनचा संसर्ग आणखी फैलावू नये म्हणून ही काळजी घेण्यात येत आहे. 

गुजरातच्या मुख्यमंत्र्यांकडून रुग्णालयाची पाहणीगुजरातमध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, या रुग्णांना मिळणारे उपचार व आरोग्य यंत्रणेच्या स्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गांधीनगर शासकीय रुग्णालयाला सोमवारी सकाळी अचानक भेट दिली. 

लक्ष केंद्रित करावे...पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोना स्थितीचा २३ डिसेंबर रोजी आढावा घेतला होता. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर नागरिक व अधिकारी या सर्वांनीच सतर्क व सावध राहावे, असे मोदी यांनी म्हटले होते. राज्यांनी आरोग्य यंत्रणा अधिक मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करावे, आवश्यक औषधांचा पुरेसा साठा करून ठेवावा, अशा सूचना पंतप्रधानांनी राज्यांना दिल्या होत्या.  

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉन