शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

OMG! मुलगा आणि सुनेकडून मिळालं नाही नातवंडांचं सुख; वृद्ध आई-वडिलांनी ठोठावला न्यायालयाचा दरवाजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 17:52 IST

हरिद्वार येथील थर्ड एसीजे एसडी कोर्टात दाखल करण्यात आलेल्या या दाव्यात याचिकाकर्त्यांनी मुलाच्या संगोपनासाठी आणि शिक्षणासाठी खर्च झालेले सुमारे 5 कोटी रुपये परत मागितले आहेत. 

हरिद्वार - आपण प्रॉपर्टीवरून नात्यांमध्ये निर्माण झालेल्या वादाच्या अनेक बातम्या ऐकल्या असतील. पण, हरिद्वारमध्ये एक अजबच प्रकरण समोर आले आहे. येथे, नातवंडाचे सुख न दिल्याने वृद्ध आई-वडिलांनी आपला मुलगा आणि सुनेविरोधात थेट न्यायालयाचाच दरवाजा ठोठावला आहे. हरिद्वार येथील थर्ड एसीजे एसडी कोर्टात दाखल करण्यात आलेल्या या दाव्यात याचिकाकर्त्यांनी मुलाच्या संगोपनासाठी आणि शिक्षणासाठी खर्च झालेले सुमारे 5 कोटी रुपये परत मागितले आहेत. 

यासंदर्भात, न्यूज18 हिंदीने दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित वृद्ध दांपत्याचे वकील अरविंद कुमार श्रीवास्तव यांनी सांगितले, की संजीव रंजन प्रसाद हे बीएचईएलमध्ये अधिकारी पदावर कार्यरत होते. सेवानिवृत्तीनंतर ते पत्नी साधना प्रसाद यांच्यासह एका हाउसिंग सोसायटीमध्ये राहत आहेत. या दांपत्याने 2016 मध्ये आला एकुलता एक मुलगा श्रेय सागर याचे लग्न नोएडातील शुभांगी सिन्हा हिच्याशी लाऊन दिले होते. श्रेय सागर पायलट आहेत. तर त्यांची पत्नी शुभांगीदेखील नोएडामध्ये नोकरी करते. या वद्ध दांपत्याने न्यायालयात प्रार्थना पत्र देत, त्यांचा मुलगा आणि सून लग्नाला 6 वर्षे होऊनही मुलाला जन्म देत नाहीत. यामुळे आपल्याला विविध प्रकारच्या मानसिक मनस्तापातून जावे लागत आहे, असे म्हटले आहे.

पालन पोषणासाठी खर्च झालेले पैसे मागितले परत -खरे तर, आपल्या अपत्याच्या पालन पोषणासाठी आई-वडील आपल्या संपूर्ण आयुष्याची कमाई लावत असतात. मात्र हरिद्वारमधील या दांपत्याने आपल्या मुलाच्या पालन पोषणासाठी खर्च केलेले जवळपास 5 कोटी रुपये सून आणि मुलाकडून परत मिळवून देण्यासाठी न्यायालयाकडे मागणी केली आहे. एवढेच नाही, तर, मुलाला एवढे सक्षम बनवूनही, आपल्याला म्हातारपणी एकटेच राहावे लागत असेल, तर हे आपल्यासोबत प्रतारणे प्रमाणे आहे, असेही त्यांचे म्हणणे आहे.  वृद्ध दांपत्याच्या याचिकेवर न्यायालयाने हे प्रकरण दाखल करून घेतली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 17 मे रोजी होणार आहे. 

टॅग्स :Courtन्यायालय