नवी दिल्ली : भारताने चर्चा सुरू करण्यासाठी कठीण निकष निश्चित केले आहेत, अशा शब्दात जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी फुटीरतावादी संघटना हुरियत कॉन्फरन्सच्या नेत्यांशी भेट घेतल्याच्या मुद्यांवरून पाकिस्तानशी चर्चा रद्द करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या ‘मिशन ४४’वर टीका करताना ओमर म्हणाले की, ‘ निवडणुकीवरील बहिष्काराचा काही जागांवर लाभ घेण्यासाठी भाजपा फुटीरतवाद्यांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु ४४ संख्या अशक्य आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
ओमर अब्दुल्ला यांची टीका
By admin | Updated: September 1, 2014 00:02 IST