PM Modi Neeraj Chopra Meeting: भारताची शान व दोन वेळचा ऑलिंपिक पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा यांने मंगळवारी पंतप्रधाननरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. नीरजसोबत त्याची पत्नी हिमानी मोर देखील होती. नीरजने या वर्षाच्या सुरुवातीला टेनिसपटू हिमानीशी लग्न केले होते. हिमानीने सध्या टेनिसमधून ब्रेक घेतला आहे. पंतप्रधान मोदींनी नीरजसोबतच्या भेटीचे फोटो शेअर केले. त्यांनी लिहिले, "आज ७, लोक कल्याण मार्ग येथे नीरज चोप्रा आणि त्यांची पत्नी हिमानी मोर यांची भेट झाली. आम्ही खेळासह विविध मुद्द्यांवर चर्चा केली."
२०२५ हे वर्ष नीरजसाठी मिश्रित स्वरूपाचे
भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा या वर्षी अखेर ९० मीटरचा अडथळा पार करण्यात यशस्वी झाला, परंतु तो जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत आपले जेतेपद राखू शकला नाही. नीरजने दोहा डायमंड लीगमध्ये ९० मीटरचे मानक अंतर गाठले. नीरजने ९०.२३ मीटरपर्यंत भालाफेक केली आणि असे करणारा तो तिसरा आशियाई आणि एकूण २५ वा खेळाडू ठरला. परंतु या वर्षी टोकियो येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पदक जिंकण्यात तो अपयशी ठरला. त्याची कामगिरी संमिश्र राहिली.
नीरजने तीन प्रमुख जेतेपदे जिंकली
नीरजने या वर्षी पॅरिस डायमंड लीग, गोल्डन स्पाइक मीट आणि एनसी क्लासिक या तीन प्रमुख जेतेपदे जिंकली. त्याने घरच्या मैदानात आणि कुटुंबातील सदस्यांसमोर एनसी क्लासिकच्या स्वरूपात जागतिक दर्जाची स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न पूर्ण केले. पण या स्टार खेळाडूला डायमंड लीगच्या अंतिम फेरीत निराशेचा सामना करावा लागला. जर्मनीच्या ज्युलियन वेबरला तो मागे टाकू शकला नाही. सप्टेंबरमध्ये झालेल्या टोकियो वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सर्वात अनपेक्षित निकाल पाहायला मिळाला. या स्पर्धेत चोप्रा फक्त ८४.०३ मीटर भालाफेक करू शकला आणि एकूण आठव्या स्थानावर राहिला.
Web Summary : Neeraj Chopra, with his wife Himani Mor, met Prime Minister Modi. They discussed sports. Chopra had mixed results in 2025, achieving 90m but missing the World title. He won three major titles but faced disappointment at the Diamond League final.
Web Summary : नीरज चोपड़ा पत्नी हिमानी मोर के साथ पीएम मोदी से मिले। उन्होंने खेल पर चर्चा की। चोपड़ा का 2025 में प्रदर्शन मिलाजुला रहा, 90 मीटर हासिल किया पर विश्व खिताब चूके। उन्होंने तीन प्रमुख खिताब जीते पर डायमंड लीग फाइनल में निराशा हुई।