शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या कपड्यांची सर्वात मोठी बाजारपेठ दिल्लीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 04:48 IST

जगभरात जुन्या कपड्यांच्या अनेक बाजारपेठा आहेत. अगदी काही शहरांत जुने कपडे विकणारी दुकानेही आहेत. ज्यांना नवे कपडे विकत घेणे शक्य होत नाही, ते या बाजारांत जातात आणि तिथून कपडे विकत घेतात.

जगभरात जुन्या कपड्यांच्या अनेक बाजारपेठा आहेत. अगदी काही शहरांत जुने कपडे विकणारी दुकानेही आहेत. ज्यांना नवे कपडे विकत घेणे शक्य होत नाही, ते या बाजारांत जातात आणि तिथून कपडे विकत घेतात. दिल्लीच्या रघुबीर नगरमध्ये असाच एक बाजार आहे, पण त्या बाजाराचे वैशिष्ट्य म्हणजे, तो पहाटे २ वाजता सुरू होतो आणि सकाळी आठ वाजेपर्यंत चालतो. किमान पाच हजार जण आपल्याकडील जुने कपडे तिथे विकायला ठेवतात. म्हणजे तिथे पाच हजार स्टॉल आहेत, असेच म्हणता येईल. रात्री तिथे काहीसा अंधार असतो. त्यामुळे प्रत्येकाकडे हातात टॉर्च असतेच.हे कपडे त्यांच्याकडे कुठून येतात आणि विकणारे कोण असतात, असा प्रश्न पडू शकतो. अनेक वर्षांपूर्वी हजारो लोक गुजरातमधून दिल्लीत आले आणि इथेच स्थायिक झाले. ते बहुतांशी वाघरी समाजाचे आहेत. भारतातील अनेक शहरांमध्ये या समाजाचे लोक दिवसा भांडी घेऊ न निघतात. जुन्या कपड्यांच्या बदल्यात ते भांडी देतात. मराठीत ते ‘बोहारी’ म्हणूनही ओळखले जातात. कदाचित, ‘वाघरी’ या शब्दावरूनच ‘बोहारी’ हा शब्द आला असू शकेल. हीच मंडळी त्या बाजारात कपडे विकायला येतात. मुख्य म्हणजे त्यापैकी ७0 ते ८0 टक्के बायकाच असतात. त्यामुळे हा बायकांनी चालविलेला बाजारच म्हटला जातो.जुने कपडे घ्यायचे, ते दुरुस्त करायचे आणि कमी किमतीत विकायचे, असा हा व्यवहार असतो. त्या कपड्यांत शर्ट, पँट, जीन्स, सलवार खमीस, साड्या यापासून चपला, बूट वगैरेही असतात. ज्यांना नवे कपडे परवडत नाहीत, ते तिथे येतात आणि १0 ते १00 रुपयांत कपडे विकत घेतात, पण त्यातील काही कपडे चांगले असतात.अनेक जण काही काळ कपडे घालतात आणि मग कंटाळा आला म्हणून ते वापरायचे बंद करतात. असे चांगल्या स्थितीतील कपडे विकायला दिल्लीजवळच्या शहरांतील काही व्यापारीही तिथं येत असतात. ते असे कपडे स्वस्तात घेतात आणि थेट दुकानांत विकायला ठेवतात. हा बाजार दिल्लीत १९८८ साली सुरू झाला आणि तो वाढतच चालला आहे.या कपडे बाजारात गर्दी होत असल्याने अनेक चोरीच्या वस्तूही काही जण तिथे विकायला ठेवतात. चपला, बूट, घड्याळे, घरातल्या लहानसहान वस्तू तिथे विक्रीला असतात. यापैकी बºयाच बायका आणि पुरुष सकाळी घरी जातात. काही वेळ आरात करतात आणि मग पुन्हा जुन्या कपड्यांच्या बदल्यात भांडी या व्यवसायाला लागतात. हे भारतातलं सर्वात मोठे जुन्या कपड्यांचे मार्केट आहे.