शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

प्रज्ञासिंहांवर खुनाचा जुना खटला चालणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 04:48 IST

विधितज्ज्ञांचा सल्ला घेणार : मध्यप्रदेश सरकारचा निर्णय

भोपाळ : भोपाळ लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर निवडून येणार असल्याचा अंदाज जनमत चाचणीत (एक्झिट पोल) व्यक्त होताच मध्यप्रदेश सरकार त्यांच्याविरुद्धचा खुनाचा जुना खटला पुन्हा सुरू करण्याच्या विचारात आहे.

काँग्रेसच्या नेतृत्वाखालील राज्यातील सरकार हा जुना खटला पुन्हा सुरू करण्याबाबत विधितज्ज्ञांचे मत जाणून घेईल, असे राज्याचे कायदामंत्री पी. सी. शर्मा यांनी सांगितले. माजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक सुनील जोशी यांच्या खून खटल्यात प्रज्ञासिंह ठाकूर या निर्दोष सुटल्या आहेत. सुनील जोशी यांची २९ डिसेंबर, २००७ मध्ये देवास जिल्ह्यात गोळ्या घालून हत्या झाली होती. २०१७ मध्ये न्यायालयाने ठाकूर आणि इतर सात आरोपींना पुरेशा पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले होते. हा खटला पुन्हा सुरू करण्यासाठी राज्य सरकार उच्च न्यायालयात अर्ज करील, असे शर्मा म्हणाले. याप्रकरणी अहवाल सादर करण्यास देवासच्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालावर आम्ही कायद्याचे मत घेऊन त्यानंतर उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेऊ, असे ते म्हणाले. शर्मा यांचा असा दावा आहे की, तेव्हाच्या जिल्हाधिकाºयांनी ते प्रकरण कायद्याचे मत घेण्यासाठी विधि विभागाकडे न पाठवता बंद करण्याचा स्वत:च निर्णय घेतला. उच्च न्यायालयात जाण्याची गरज नाही, असा निर्णय घेण्याऐवजी जिल्हाधिकाºयाने कायदा विभागाकडे अहवाल पाठवायला हवा होता, असे शर्मा म्हणाले.

हे तर सुडाचे राजकारण -भाजपभोपाळ लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांच्याविरुद्ध भाजपच्या उमेदवार म्हणून साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी लढण्याचा निर्णय घेतला व त्यामुळे राज्य सरकार त्यांच्याविरुद्धचा खटला पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेत असल्याचे दिसते.हे सुडाचे राजकारण आहे, असे भाजपचे प्रवक्ते रजनीश अग्रवाल यांनी म्हटले. २००८ मधील मालेगाव स्फोट खटल्यात ठाकूर या आरोपी असून, त्यांना सध्या जामीन मंजूर झालेला आहे.

टॅग्स :Sadhvi Pragya Singh Thakurसाध्वी प्रज्ञाMadhya Pradesh Lok Sabha Election 2019मध्य प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल 2019