शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
4
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
5
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
6
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
7
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
8
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
9
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
10
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
11
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
12
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
13
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
14
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
15
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
16
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
17
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
18
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
19
Tejasvee Ghosalkar: तेजस्वी घोसाळकर मुंबै बँकेच्या संचालकपदी
20
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना

इंधन दरांबाबत तेलमंत्र्यांची भूमिका संदिग्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 01:02 IST

धर्मेंद्र प्रधान; सरकारला आर्थिक गरजाही पाहायला हव्यात

नवी दिल्ली: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चटक्यांनी लोक होरपळत असले तरी ही झळ कमी करण्यासाठी केंद्र सरकार काय करणार याविषयी पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी कोणतीही स्पष्ट भूमिका घेतली नाही.एका कार्यक्रमात इंधन दरवाढीबद्दल प्रधान म्हणाले की, दरवाढीच्याझळीची सरकारला चिंता आहे. पण सरकारला आर्थिक गरजाही पाहाव्या लागतात. इंधन दर आटोक्यात राहावेत यासाठी उत्पादन शुल्क कमी करणार का, या प्रश्नावर ते म्हणाले की, राज्यांनी विक्रीकर वा व्हॅट कमी करावा.तुमच्या मंत्रालयाने उत्पादन शुल्क कमी करण्याचा प्रस्ताव दिला आहे का, या प्रश्नावर ते म्हणाले, असे अर्धवट उपाय उपयोगी नाहीत. वित्तीय संतुलनाकडेही लक्ष द्यायला हवे. जागतिक घडामोडींमुळे हे दर वाढत आहेत. ‘जीडीपी’च्या ३.५ टक्के असलेली वित्तीय तूट ३.३ टक्क्यांवर आणण्याचा सरकारचा संकल्प आहे. त्यामुळे इंधनावरील उत्पादन शुल्क कमी करणे योग्य नाही, असे वित्त मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले होते. उत्पादन शुल्क लिटरमागे एक रुपयाने कमी केले तरी सरकारला १३ हजार कोटींच्या महसूलावर पाणी सोडावे लागते. त्यामुळे ग्राहकाला एक-दोन रुपये जादा मोजावे लागण्याच्या तुलनेत या वित्तीय तुटीचा परिणाम अधिक मोठा आहे.करांमुळेच इंधन महागकेंद्र पेट्रोलवर लिटरमागे १९.४८ रुपये तर डिझेलवर १५.३३ रुपये कर लावते. राज्यांमधील विक्रीकर वा व्हॅटचे दर निरनिराळे असतात.नोव्हेंबर २०१४ ते जानेवारी २०१६ या १५ काळात कच्च्या तेलाच्या किंमती घसरत असताना सरकारने पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात नऊ वेळा वाढ केली आणि एकदाच दोन रुपये कपात केली.त्या १५ महिन्यांत पेट्रोलवरील उत्पादन शुल्क लिटरमागे ११.७७ रुपयांनी तर डिझेलवरील १३.४७ ने वाढले. यामुळे उत्पादन शुल्काचा महसूल आधीच्या तुलनेत दुप्पट होऊ न २.४२ लाख कोटी रुपयांवर पोहोचला.

टॅग्स :businessव्यवसाय