शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अहो आश्चर्यम ! आता जीमेलवरून पाठवता येणार पैसे

By admin | Updated: March 16, 2017 22:47 IST

अँड्रॉइड फोन वापरकर्त्यांना आता जीमेल अ‍ॅपच्या माध्यमातून पैसे पाठवता येणार आहेत.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 16 - अँड्रॉइड फोन वापरकर्त्यांना आता जीमेल अ‍ॅपच्या माध्यमातून पैसे पाठवता येणार आहेत. ग्राहकांच्या आग्रहास्तव गुगलनं हे नवीन फीचर ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिलं आहे. विशेष म्हणजे ही सेवा गुगलमार्फत मोफत देण्यात येणार आहे. सध्या तरी हे फीचर अमेरिकेतल्या वापरकर्त्यांसाठी वापरात आणलं आहे. मात्र लवकरच ते सर्व ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.'फी-फ्री' नावाच्या या फीचरमध्ये जीमेल अ‍ॅपमधून फोटो किंवा फाईल तुम्हाला सहजगत्या पाठवता येणार असून, त्याच पद्धतीने आता पैसे पाठवणं सहजशक्य होणार आहे. हे पैसे वापरकर्त्यांना स्वतःच्या बँक खात्यातही जमा करता येणार आहेत. या अ‍ॅपच्या माध्यमातून पैसे पाठवणे हे ई-मेलमधून एखादी फाईल पाठवण्याइतकं सोपं झालं आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी गुगलनं ऑनलाइन ग्राहकांच्या व्यवहारासाठी अशाच प्रकारचं गुगल वॉलेट हे फीचर लाँच केलं होतं. त्याला ग्राहकांचा अल्प प्रतिसाद मिळाला होता. अँड्रॉइड मोबाईल युजर्ससाठी हे फीचर उपलब्ध नसल्यानं त्याला लोकांनी जास्त पसंती दिली नव्हती. जगभरात जीमेलचं जाळं मोठ्या विस्तारत असून, जीमेलचे आजमितीस जवळपास 1 अब्ज वापरकर्ते आहेत. त्यातील 75 टक्के लोक हे मोबाईलच्या माध्यमातून जीमेलचा वापर करतात. तसेच जगभरातल्या स्मार्टफोन वापरकर्त्यांपैकी 80 टक्के युझर्स हे अँड्रॉइड फोन वापरतात. त्यामुळेच हे फीचर जास्तीत जास्त लोकांच्या पसंती उतरणार असल्याचा गुगलला विश्वास आहे.