शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अप्पर सचिव आणि सिनिअर रँक अधिकाऱ्यांना आता रोज कार्यालयात हजर रहावं लागणार, केंद्रानं जारी केले आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 19:01 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असताना देशातील बहुतेक राज्यांनीही अनलॉकच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. यातच आता केंद्र सरकारनंही सरकारी कामकाज पुन्हा एकदा रुळावर आणण्यासाठीची तयारी सुरू केली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असताना देशातील बहुतेक राज्यांनीही अनलॉकच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. यातच आता केंद्र सरकारनंही सरकारी कामकाज पुन्हा एकदा रुळावर आणण्यासाठीची तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर अप्पर सचिव आणि त्यापेक्षा वरीष्ठ अधिकाऱ्यांना आता दैनंदिन पातळीवर कार्यालयात हजर राहण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. या सर्व अधिकाऱ्यांना आता कार्यालयातून काम करावं लागणार आहे. 

कोरोना प्रादुर्भावामुळे केंद्र सरकारनं सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयात हजर राहण्यासाठी ऐश्चिक स्वरुपाचा पर्याय दिला होता. यात अधिकाऱ्यांना दैनंदिनरित्या कार्यालयात हजर राहण्याचं बंधन नव्हतं. केवळ ५० टक्के उपस्थितीसह सरकारी कार्यालयं सुरू होती. केंद्राचे हे आदेश १५ जूनपर्यंत कायम ठेवण्यात आले होते. पण आता कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस घटत असल्यामुळे अप्पर सचिव आणि त्यावरील अधिकाऱ्यांना दैनंदिन पातळीवर कार्यालयात हजेरी लावावी लागणार आहे. 

दरम्यान, कार्यालयात उपस्थित राहणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करावं लागणार आहे. यात मास्क वापरणं, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं, सॅनिटायझरचा सुयोग्य वापर करणं, असे नियम घालून देण्यात आले आहेत. 

देशात गेल्या २४ तासांत ७० हजार ४२१ नवे रुग्णदेशाची राजधानी दिल्लीसह बहुतेक राज्यांमध्ये आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानं निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. देशातील दैनंदिन रुग्णवाढ आता १ लाखाच्या खाली आली आहे. देशात गेल्या २४ तासांत ७० हजार ४२१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यासह देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता २,९५,१०,४१० वर पोहोचली आहे. तसेच देशातील सक्रिय रुग्णांची संख्या देखील आता १० लाखांच्या खाली आली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCentral Governmentकेंद्र सरकार