शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीपूर्वी बदल्या; महाराष्ट्रातील आदेश देशभर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2024 06:39 IST

 निवडणुकीपूर्वी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याच्या निवडणूक आयोगाच्या धोरणातील पळवाटांचा राज्य सरकारांकडून गैरफायदा घेतला जात होता.

नवी दिल्ली : निवडणुकीपूर्वी ज्या अधिकाऱ्यांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या करण्यात आल्या आहेत, त्यांची त्याच लोकसभा मतदारसंघात नियुक्ती केली जाणार नाही, याची खातरजमा करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने राज्यांना केल्या आहेत. 

 निवडणुकीपूर्वी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याच्या निवडणूक आयोगाच्या धोरणातील पळवाटांचा राज्य सरकारांकडून गैरफायदा घेतला जात होता. त्यामुळे आयोगाने धोरणात बदल करून या पळवाटा बंद करण्याचा प्रयत्न केला आहे. 

राज्य सरकारांनी अधिकाऱ्यांची त्याच लोकसभा मतदारसंघाजवळील जिल्ह्यात बदली केल्याची प्रकरणे निदर्शनास आली होती. त्याची गांभीर्याने दखल घेऊन निवडणूक आयोगाने हे पाऊल उचलले. जे अधिकारी त्यांच्या गृहजिल्ह्यात नियुक्त आहेत किंवा ज्यांचा एकाच जागेवरील कार्यकाळ तीन वर्षे किंवा त्याहून अधिक झाला आहे, त्यांची निवडणुकीपूर्वी बदली करण्याचे निवडणूक आयोगाचे धोरण आहे.

दिखावा न करता योग्य पालन करावे... विद्यमान धोरणातील त्रुटी दूर करताना आयोगाने दोन मतदारसंघ असलेली राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना सोडून उर्वरित राज्यांनी अधिकाऱ्यांची जिल्ह्याबाहेर बदली केली आहे, त्यांची त्याच मतदारसंघात नियुक्ती होणार नाही याची खातरजमा करावी.

केवळ देखावा करू नये तर धोरणाचे योग्यरीत्या पालन करावे, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस