आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा
By admin | Updated: January 31, 2015 00:34 IST
आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा
आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा
आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांविरुद्ध गुन्हानागपूर : पैशासाठी शारीरिक व मानसिक छळ केल्यामुळे २६ जानेवारीला विवाहितेने आत्महत्या केली होती. पती, दीर आणि जाऊने संगनमत करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे स्पष्ट झाल्यामुळे सीताबर्डी पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. काचीपुरा रामदासपेठ येथील पाटणकर चक्कीमागील रहिवासी नम्रता कमलेश गेडाम या विवाहितेने २६ जानेवारीला सकाळी ६ पूर्वी आपल्या राहत्या घरात पंख्याला ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सीताबर्डी पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. दरम्यान तपासात नम्रताने पती, दीर आणि जाऊच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची बाब पुढे आली. या प्रकरणी जितेंद्र सदाशिव मडावी (३५) रा. नशेमन सोसायटी, गायत्री कॉलनी मागे, हजारीपहाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)