शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांचीही झालीय फसवणूक; म्हणाले, "अद्याप पैसे मिळाले नाहीत"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 17:39 IST

मुख्यमंत्री मोहन चरण माझी म्हणाले की, चिटफंड घोटाळ्यात आपली दोनदा फसवणूक झाली आहे.

चिटफंड घोटाळ्याचे आपणही बळी ठरल्याचे ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी मंगळवारी म्हटले आहे. तसेच, लोकांनी पॉन्झी योजनांबाबत सजग राहून कष्टाने कमावलेला पैसा वाचवण्यासाठी जागरूक राहण्याचे आवाहन त्यांनी केले. ते राज्यस्तरीय राष्ट्रीय ग्राहक दिन सोहळ्यात बोलत होते.

मुख्यमंत्री मोहन चरण माझी म्हणाले की, चिटफंड घोटाळ्यात आपली दोनदा फसवणूक झाली आहे. 1990 आणि 2002 मध्ये दोन पॉन्झी कंपन्यांनी माझी फसवणूक केली. मी त्या योजनांमध्ये पैसे जमा केले, परंतु जेव्हा मॅच्योरिटीची वेळ आली तेव्हा त्या कंपन्या गायब झाल्या. त्यानंतर फसवणूक झालेले पैसे परत मिळण्याची प्रक्रिया इतकी लांब आणि कठीण होती. त्यामुळे आपण पैसे परत घेऊ शकलो नाही.

पॉन्झी कंपन्यांच्या एजंटांनी दिलेली गोड आश्वासने फसवणूक असल्याचे सांगत मुख्यमंत्री मोहन चरण माझी म्हणाले की, एजंट योजना अतिशय आकर्षक पद्धतीने मांडायचे आणि मीही त्यांच्या फंदात पडून गुंतवणूक केली, पण शेवटपर्यंत मला माझे पैसे मिळू शकले नाहीत.

केंद्राच्या प्रयत्नांचे कौतुक केलेग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या प्रयत्नांचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी कौतुक केले. ते म्हणाले की, सध्या परिस्थिती खूप बदलली आहे. चिट फंड घोटाळे थांबवण्यासाठी आणि ग्राहकांची फसवणूक होण्यापासून वाचवण्यासाठी केंद्राने आता कडक कायदे केले आहेत आणि नियम मजबूत केले आहेत. हे पाऊल ग्राहकांना संरक्षण देण्यासाठी एक महत्त्वाचा उपक्रम आहे.

कंपन्यांच्या फंदात पडू नका- मुख्यमंत्रीयासोबतच कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी संपूर्ण माहिती घ्यावी आणि पॉन्झी कंपन्यांच्या फंदात पडू नये, असे आवाहनही मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी केले. तसेच, अशी फसवणूक थांबवण्यासाठी जनजागृती आणि दक्षता आवश्यक आहे. कष्टाने कमावलेला पैसा सुरक्षित ठेवणे हे आमचे प्राधान्य असले पाहिजे, असेही मुख्यमंत्री मोहन चरण माझी म्हणाले. 

टॅग्स :fraudधोकेबाजीOdishaओदिशा