शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

अश्लीलता आणि सौंदर्य बघणाऱ्याच्या नजरेत - हायकोर्ट   

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2018 09:13 IST

ज्याप्रकारे सौंदर्य बघणाऱ्याच्या नजरेवर अवलंबून असते त्याच प्रमाणे अश्लीलताही सुद्धा बघणाऱ्यांच्या नजरेतच असते, अशी टिप्पणी केरळ हायकोर्टाने केली आहे.

तिरुवनंतपूरम - ज्याप्रकारे सौंदर्य बघणाऱ्याच्या नजरेवर अवलंबून असते त्याच प्रमाणे अश्लीलताही सुद्धा बघणाऱ्यांच्या नजरेतच असते, अशी टिप्पणी केरळ हायकोर्टाने केली आहे. मल्याळम मासिक गृहलक्ष्मीविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या एका याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने हे निरीक्षण नोंदवले आहेत. तसेच मासिकाविरोधात दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आहे.  गुरुवारी या प्रकरणी  निकाल सुनावताना न्यायालयाने गृहलक्ष्मी मासिकाविरोधातील याचिका फेटाळून लावली. ज्याप्रकारे सौंदर्य बघणाऱ्याच्या नजरेवर अवलंबून असते त्याच प्रमाणे अश्लीलताही सुद्धा बघणाऱ्यांच्या नजरेतच असते. या छायाचित्रात काही अश्लील आहे असे आम्हाला वाटत नाही. तसेच छायाचित्राला दिलेल्या कॅप्शनमध्येही पुरुषांसाठी काही आक्षेपार्ह टिप्पणी आहे, असे आम्हाला वाटत नाही, अशी टिप्पणी उच्च न्यायालयाने केली. गृहलक्ष्मी या मासिकाने मार्च महिन्यातील आपल्या अंकात नवजात मुलाला स्तनपान करत असेल्या महिलेचे छायाचित्र प्रसिद्ध केले होते. या छायाचित्रात पेशाने एअरहॉस्टेस असलेली आणि मॉडेल व लेखिका म्हणून काम पाहणारी गिलू जोसेफ ही मुलाला स्तनपान करत दिसत होती. तसेच स्तनपान करणाऱ्या महिलांकडे रोखून पाहणाऱ्यांना मुखपृष्ठावरून एक संदेशही देण्यात आला होता. केरळला माता सांगत आहेत की, कृपया आमच्याकडे रोखून पाहू नका, आम्हाला स्तनपानाची गरज आहे, असे या संदेशात म्हटले होते. हे छायाचित्र प्रकाशित झाल्यानंतर सोशल मीडियावर वाद सुरू झाला होता. तसेच हे छायाचित्र कामुक असून, धार्मिक आणि सांप्रदायिक भावना दुखावणारे असल्याचे आरोप करण्यात आले होते. या छायाचित्राविरोधात केरळमधील कोल्लमच्या सीजेएम कोर्टात खटला दाखल करण्यात आला होता. तसेच गृहलक्ष्मी या मासिकाविरोधात पॉक्सो कायदा आणि जुवेलनाइल जस्टिस अॅक्टच्या कलम 45 आणि महिला अश्लीलता प्रतिनिधित्व अधिनियम 1986 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान,  एंटोनी डोमिनिक आणि डामा शेषाद्री नायडू यांच्या खंडपीठाने निकाल देताना सांगितले की, "भारतीय कलेने नेहमीच मनुष्याच्या शरीराचे सौंदर्य दाखवले आहे. मग कामसूत्र असो वा राजा रविवर्माची चित्रे वा अजंठा येथील शिल्पे. पूर्वीच्या जमान्यातील लोक आपल्यापेक्षा अधिक समजुतदार होते." दरम्यान ही याचिका दाखल करणारे वकील विनोद मॅथ्यू यांनी म्हटले होते की, हे छायाचित्र खूप कामूक असून, महिलांना कमीपणा दाखवणारे आहे. तसेच ख्रिश्चन महिलेने मंगळसूत्र आणि कुंकू लावण्यालाही आक्षेप घेण्यात आला होता.   

टॅग्स :Courtन्यायालयKeralaकेरळnewsबातम्या