शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

OBC Lists: दुष्मनी सोडून विरोधक आज मोदी सरकारची साथ देणार; OBC संबंधी विधेयकासाठी निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 12:52 IST

Oppn may use 'OBC bill' to seek 50% quota cap removal सोमवारी संसद परिसरात झालेल्या या विरोधकांच्या बैठकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीदेखील भाग घेतला होता. या बैठकीला काँग्रेससह डीएमके, टीएमसी, एनसीपी, शिवसेना, सपा, सीपीएम, राजद, आप, सीपीआय, नॅशनल कॉन्फ्रेंस, मुस्लिम लीग, लोजद, आरएसपी, केसी (एम) या पक्षाच्या नेत्यांचा सहभाग होता. 

केंद्र सरकार (Centre Government) द्वारे सोमवारी लोकसभेमध्ये संविधान संशोधन विधेयक मांडले जाणार आहे. यानुसार राज्यांनादेखील ओबीसी लिस्ट (OBC Lists) तयार करण्याचा अधिकार मिळणार आहे. यावर विरोधकांनी म्हणजेच 15 विरोधी पक्षांनी या विधेयकाचे समर्थन केले आहे. सोमवार सदनाच्या कार्यवाहीला सुरुवात होण्याआधी विरोधकांनी एक बैठक घेतली, यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. (Fifteen Opposition parties met at the office of the Leader of Opposition in Rajya Sabha Mallikarjun Kharge.)

काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी ओबीसी लिस्टशी संबंधीत या विधेयकाचे सर्व विरोधी पक्ष समर्थन करतील असे म्हटले आहे. यामुळे हे विधेयक संसदेत मांडले जावे, यावर चर्चा केली जावी, म्हणजे ते लगेचच मंजूर होईल. ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय आहे. यामुळे आम्ही बाकीचे मुद्दे या विधेयकासाठी बाजुला ठेवत आहोत आणि हे विधेयक पास करण्यासाठी तयार आहोत. 

सोमवारी संसद परिसरात झालेल्या या विरोधकांच्या बैठकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीदेखील भाग घेतला होता. या बैठकीला काँग्रेससह डीएमके, टीएमसी, एनसीपी, शिवसेना, सपा, सीपीएम, राजद, आप, सीपीआय, नॅशनल कॉन्फ्रेंस, मुस्लिम लीग, लोजद, आरएसपी, केसी (एम) या पक्षाच्या नेत्यांचा सहभाग होता. 

आजपासून पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरु होत आहे. विरोधकही सोबत आले आहेत, यामुळे मोदी सरकारला हे बिल पास करण्यासाठी कोणतीही अडचण नाहीय. पेगाससमुळे संसदेचे अधिवेशन वाया गेले आहे. विरोधकांच्या विरोधामुळे काही तासच कामकाज झालेले आहे. करोडो रुपये वाया गेले आहेत.  सरकारकडून आज सहा विधेयके पारित केली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये डिपॉजिट इंश्योरेंस क्रेडिट गॅरंटी बिल, होमिओपथी बिल, लिमिटेड लाइबिलीटी पार्टनरशिप बिल आदी आहेत. 

टॅग्स :OBCअन्य मागासवर्गीय जातीOBC Reservationओबीसी आरक्षणlok sabhaलोकसभा