शहरं
Join us  
Trending Stories
1
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
2
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
3
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
4
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
5
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
6
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
7
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
8
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
9
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
10
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
11
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
12
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
13
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
14
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
15
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
16
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
17
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
18
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
19
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
20
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!

ओबामांचे मोदींना निमंत्रण

By admin | Updated: July 12, 2014 01:51 IST

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिका भेटीचे औपचारिक निमंत्रण दिले असून, मोदी यांनी ते स्वीकारत आपण सप्टेंबर महिन्यात अमेरिकेला भेट देऊ असे म्हटले आहे.

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिका भेटीचे औपचारिक निमंत्रण दिले असून, मोदी यांनी ते स्वीकारत आपण सप्टेंबर महिन्यात अमेरिकेला भेट देऊ असे म्हटले आहे. मोदी यांची भेट घेऊन भारत-अमेरिका संबंध अधिक दृढ करण्याचा विचार ओबामा यांनी मांडला आहे. 
पंतप्रधान मोदी यांनी या निमंत्रणाबद्दल ओबामा यांचे आभार मानले असून, सप्टेंबर महिन्यात आपण अमेरिकेला भेट देऊ व या भेटीतून ठोस निष्कर्ष हाती येतील असे म्हटले             आहे. तसेच भारत व अमेरिका यांच्या मैत्रीला या भेटीतून ऊर्जा व चालना मिळेल अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे. 
ओबामा यांचे निमंत्रणाचे पत्र उप परराष्ट्रमंत्री विल्यम बर्न्‍स यांनी नरेंद्र मोदी यांना दिले. बर्न्‍स आज पंतप्रधान मोदी यांना भेटण्यासाठी आले होते. या पत्रत ओबामा म्हणतात, मोदी यांच्या अमेरिका भेटीची आपण वाट पाहत आहोत. या भेटीत भारत व अमेरिका यांच्यातील मैत्रीला 21 व्या शतकाच्या खास भागीदारीचे स्वरूप देता येईल. पंतप्रधान कार्यालयाने यासंदर्भात निवेदन प्रसिद्ध केले आहे.  
मोदी यांनी यावेळी ओबामा यांनी केलेल्या अभिनंदनाची आठवण केली. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर ओबामा यांनी फोनवर त्यांचे अभिनंदन केले होते. तसेच विस्तृत पत्र पाठवून आज निमंत्रण दिले, त्याचेही कौतुक मोदी यांनी केले आहे. 
उप परराष्ट्रमंत्री बर्न्‍स व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल, परराष्ट्र सचिव सुजाता सिंग, अमेरिकेच्या दूत कॅथलिन स्टीफन्स व अमेरिकेच्या दक्षिण व मध्य आशियाच्या सहायक परराष्ट्रमंत्री निशा बिस्वाल हे उपस्थित होते. 
(लोकमत न्यूज नेटवर्क) 
 
4भारत व अमेरिका यांच्यातील मैत्रीच्या नात्याला नवी ऊर्जा मिळाल्यास त्यातून दक्षिण आशियाचा परिसर व संपूर्ण जगाला संदेश दिला जाईल, असे मोदी यांना वाटते. भारत व अमेरिका हे दोन मोठे लोकशाही देश आहेत. 
 
4या दोन देशांच्या मैत्रीचा फायदा उभय देशांपुरताच राहू नये, तर जागतिक पातळीवर तो शांततेचा, स्थैर्य व समृद्धीचा प्रभावी स्रोत ठरावा, असे मोदी यांनी म्हटले आहे.