नॉयलॉन मांजा विक्रीवर बंदी
By admin | Updated: January 14, 2017 00:06 IST
जळगाव - मकरसंक्रांतीनिमित्ताने अनेक ठिकाणी पतंग उत्सव होतो तसेच नागरिकही पतंग उडवितात. पतंगासाठी काही ठिकाणी नॉयलॉन मांजा वापरतात. याचा वन्य पशुपक्ष्यांना त्रास होतो तर अनेक पक्ष्यांना जीव गमवावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन ११ ते २० जानेवारी या काळात पतंग उडविण्यासाठी तयार करण्यात येणारा नॉयलॉन मांजा निर्मिती व विक्रीस बंदी घालण्यात येत असल्याचे अपर जिल्हाधिकारी राहूल मुंडके यांनी कळविले आहे.
नॉयलॉन मांजा विक्रीवर बंदी
जळगाव - मकरसंक्रांतीनिमित्ताने अनेक ठिकाणी पतंग उत्सव होतो तसेच नागरिकही पतंग उडवितात. पतंगासाठी काही ठिकाणी नॉयलॉन मांजा वापरतात. याचा वन्य पशुपक्ष्यांना त्रास होतो तर अनेक पक्ष्यांना जीव गमवावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन ११ ते २० जानेवारी या काळात पतंग उडविण्यासाठी तयार करण्यात येणारा नॉयलॉन मांजा निर्मिती व विक्रीस बंदी घालण्यात येत असल्याचे अपर जिल्हाधिकारी राहूल मुंडके यांनी कळविले आहे. निवृत्ती वेतन धारकांचा मेळावाजळगाव - निवृत्ती वेतनधारकांच्या निवृत्ती वेतनाविषयीच्या अडीअडचणींवर निर्णय व चर्चेसाठी जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत येत्या २३ जानेवारी रोजी दुपारी ४.३० वाजता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्प बचत भवनात हा मेळावा होणार असल्याचे कळविण्यात आले आहे.न्यायालय कर्मचारी संघ अध्यक्षपदी श्याम तारखेडकरजळगाव - जिल्हा चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेची बैठक होऊन २०१७ ते २०१९ या कालावधीसाठी अध्यक्षपदी श्याम तारखेडकर यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणीत सचिव सलमान पठाण, उपाध्यक्ष संजय निकम, दर्शन जुनागडे, सहसचिव कैलास बाविस्कर, कोषाध्यक्ष योगेश फुले, सहकोषाध्यक्ष पी.डी. पाटील, महिला प्रतिनिधी म्हणून कविता पाटील, जिल्हा संघटक सुरेश सुरवाडकर, ए.एम.तडवी, आर.एल.पाटील यांची निवड झाली. रोटरीतर्फे नितीन विसपुते यांचे व्याख्यानजळगाव - युवक दिनाचे औचित्य साधून रोटरीतर्फे सिंधी कॉलनीतील न्यू आदर्श इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये व्याख्यानाचे आयोेजन करण्यात आले होते. यश आणि व्यसनमुक्ती या विषयावर नितीन विसपुते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आर.एस. केसवाणी, मुख्याध्यापक अरविंद मोतीरामाणी व इतर उपस्थित होते.