शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

नर्सेस फेडरेशनचे कामबंद आंदोलन शासकीय रुग्णालयातील प्रकार : डॉक्टराकडून अधिपरिचारिकेशी असभ्य वर्तन

By admin | Updated: August 28, 2015 23:37 IST

सोलापूर : शासकीय रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या अधिपरिचारिकेला किरकोळ कारणावरून असभ्य भाषेत बोलून अपमान केल्यामुळे महाराष्ट्र गव्हन्र्मेंट नर्सेस फेडरेशनच्या वतीने शुक्रवारी सकाळी कामबंद आंदोलन करण्यात आले. डॉ. वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांनी मध्यस्थी करून डॉक्टर आणि नर्सेस फेडरेशन यांच्यात समन्वय घडवून आणला, त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

सोलापूर : शासकीय रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या अधिपरिचारिकेला किरकोळ कारणावरून असभ्य भाषेत बोलून अपमान केल्यामुळे महाराष्ट्र गव्हन्र्मेंट नर्सेस फेडरेशनच्या वतीने शुक्रवारी सकाळी कामबंद आंदोलन करण्यात आले. डॉ. वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांनी मध्यस्थी करून डॉक्टर आणि नर्सेस फेडरेशन यांच्यात समन्वय घडवून आणला, त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
शासकीय रुग्णालयातील अधिपरिचारिका रार्जशी राठोड या गुरुवारी प्रसूती विभागात कार्यरत होत्या. 7.45 वा. डॉ. अभिजित शिंगारे यांनी एक महिला प्रसूत झाल्यानंतर तिला तेथून हलवण्यास सांगितले. रार्जशी राठोड यांनी हे काम तेथील संबंधित कर्मचार्‍याला सांगितले; मात्र ती कामात असल्याने पेशंट हलवण्यास उशीर झाला. त्यामुळे चिडलेल्या डॉ. अभिजित शिंगारे याने अधिपरिचारिका रार्जशी राठोड यांना ओरडण्यास सुरुवात केली. तू इथे काम करू नको ‘गेट आऊट फ्रॉम हिअर’ अशी भाषा वापरून अपमान केला. त्यावेळी रार्जशी राठोड यांनी मी सरकारी नोकर आहे. तुम्ही मला बाहेर जा किंवा घरी जा असे म्हणू शकत नाही असे बजावले, तेव्हा डॉ. अभिजित शिंगारे यांनी गव्हन्र्मेंट गेले खड्डय़ात तू आधी बाहेर हो असे म्हणाले.
अपमानित झाल्याने रार्जशी राठोड यांनी तत्काळ महाराष्ट्र गव्हन्र्मेंट नर्सेस फेडरेशनच्या अध्यक्षा रुथ कलबंडी व सचिव पांडुरंग बाबर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तत्काळ प्रसूती विभागाला भेट दिली व परिस्थितीची पाहणी केली. शुक्रवारी सकाळी 7.30 वा. त्यांनी अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांना मोबाईलवरून संपर्क केला व सर्व स्थिती सांगितली. दुपारी 12 वा. अधिष्ठाता रुग्णालयात आले त्यांनी संबंधित डॉक्टर व नर्सला समोर बोलावून झालेल्या घटनेची माहिती घेतली. दोघांकडून झालेला प्रकार गैरसमजुतीतून झाल्याचे लिहून घेतले. त्यानंतर नर्सेस फेडरेशनने कामबंद आंदोलन मागे घेतले. यावेळी महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटनेचे शंकर जाधव, शंतनू गायकवाड उपस्थित होते. (प्रतिनिधी)
चौकट..
रार्जशी राठोड यांच्यावर दुसर्‍यांदा घडला प्रकार..
0 रार्जशी राठोड 25 दिवसांपूर्वी याच विभागात काम करीत असताना तेथील महिला डॉ. निशीता नाथ यांच्यासोबत वाद झाला होता. तेव्हा अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांनी मध्यस्थी करून चौकशी समिती नियुक्त केली होती; मात्र अद्याप त्याचा कसलाच अहवाल तयार झाला नाही. समितीमधील एकाही सदस्याने याची चौकशी केली नाही कारण त्यांना अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांचे रितसर पत्रच प्राप्त झाले नाही. त्यानंतर घडलेला हा दुसरा प्रकार आहे.
0 गेल्यावेळेस तत्काळ चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाला असता आणि कारवाई झाली असती तर हा प्रकार घडला नसता. डॉक्टर अधिपरिचारिकेला दुय्यम वागणूक देतात. महिलेशी कसे बोलावे याचे तारतम्य नाही. या प्रकरणी कारवाई न झाल्यास आम्ही भविष्यात शांत राहणार नाही असा इशारा महाराष्ट्र गव्हन्र्मेंट फेडरेशन सोलापूर शाखा अध्यक्ष रुथ कलबंडी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
कोट..
गेल्या वेळेस डॉ. निशीता नाथ यांनी मला ढकलून दिले होते, त्यावर चौकशी समिती नेमण्यात आली. याचा राग मनात धरून अन्य डॉक्टर मला जाणीवपूर्वक त्रास देत आहेत. गेल्या वेळेस माझ्याकडे पुरावा नव्हता; मात्र आता माझ्याकडे डॉ. अभिजित शिंगारे यांनी केलेल्या असभ्य वर्तनाचे रेकॉर्डिंग आहे. ते मला बोलत असताना त्यांचे दोन हात इतर डॉक्टरांनी धरले होते. ते मला मारण्यासाठी अंगावर येत होते.
रार्जशी राठोड, अधिपरिचारिका, शासकीय रुग्णालय, सोलापूर.
कोट..
असा प्रकार वारंवार घडत असेल तर संबंधित डॉक्टराला 6 महिने बॅक केले पाहिजे. ‘गव्हन्र्मेंट गेले खड्डय़ात, तू चल बाहेर’ असे म्हणणार्‍या डॉक्टरवर कारवाई झाली पाहिजे. अधिपरिचारिकेला नेहमी अशी वागणूक दिली जाते, हा प्रकार थांबला पाहिजे. महिला कर्मचार्‍यांशी नीट वागावे.
रुथ कलबंडी, अध्यक्षा, महाराष्ट्र गव्हन्र्मेंट नर्सेस फेडरेशन, सोलापूर शाखा.
कोट..
झालेला प्रकार हा दोघांच्या गैरसमजुतीमधून झाला आहे. या प्रकरणी दोघांकडून लेखी माफीनामा घेतला आहे. यापूर्वी झालेल्या वादावरून नेमण्यात आलेल्या चौकशी समितीचा अहवाल दोन दिवसात प्राप्त होईल त्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल.
डॉ. राजाराम पोवार, अधिष्ठाता, डॉ. वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर. (सिव्हिल हॉस्पिटल)